Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/wagh/public_html/index.php:1) in /home/wagh/public_html/wp-includes/feed-rss2.php on line 8
नाशिक बातमी https://nashikbatmi.com आपलं शहर...आपली बातमी Sat, 04 Jan 2025 09:12:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://nashikbatmi.com/wp-content/uploads/2024/10/cropped-nashik-batmi-logo-32x32.jpeg नाशिक बातमी https://nashikbatmi.com 32 32 ५५ व्या जीएसटी परिषदेविषयी सीए चेतन बंब यांचे मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन https://nashikbatmi.com/?p=1628 https://nashikbatmi.com/?p=1628#respond Sat, 04 Jan 2025 04:46:57 +0000 https://nashikbatmi.com/?p=1628 नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स, अहमदनगर व मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम नाशिक प्रतिनिधी :/जीएसटी परिषदेच्या ५४ व ५५…

The post ५५ व्या जीएसटी परिषदेविषयी सीए चेतन बंब यांचे मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन first appeared on नाशिक बातमी.

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स, अहमदनगर व मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांचा संयुक्त उपक्रम

नाशिक प्रतिनिधी :/जीएसटी परिषदेच्या ५४ व ५५ व्या बैठकीत जीएसटी कायद्यातील तरतुदी बाबत अनेकविध बाबींवर चर्चा व निर्णय घेण्यात आले. यातील बहुतांशी निर्णय हे व्यापारी, करदात्यांवर प्रभाव टाकणारे आहेत. जीएसटी कायद्यात सुधारणा/बदल याचबरोबर जीएसटी संरचनेत होऊ घातलेले बदल, थकीत करदात्यांना दिलासा देणारी जीएसटी विभागाची “अभय योजना” अशा अनेक महत्वपूर्ण बाबींची तपशीलवार माहीती राज्यातील कर सल्लागार, व्यापारी व करदाते यांना सोप्या भाषेत समजून घेता यावी याकरिता नाशिक मधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट व जीएसटी अभ्यासक तज्ञ सीए चेतन बंब यांचे नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स च्या वतीने येत्या गुरुवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी “ऑनलाईन वेबिनारचे” आयोजन करण्यात आले आहे.

“जीएसटी कायद्यात सात्यताने होणारे बदल /सुधारणा तसेच जीएसटी कायदयातील नवीन तरतुदी, करण्यात आलेल्या बदलांची
कर क्षेत्रातील व्यावसायिकांना, व्यापारी वर्गाला माहिती व्हावी, त्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी या वेबिनार मुळे, सखोल व अद्यावत ज्ञान प्राप्त करून घेता येणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त कर सल्लागार, सीए, वकील तसेच जीएसटी कायद्याशी संबंधित, अभ्यासक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी केले आहे”.

वेबिनार नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ८८८८३३३८८८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

The post ५५ व्या जीएसटी परिषदेविषयी सीए चेतन बंब यांचे मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1628 0
नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू  https://nashikbatmi.com/?p=1626 https://nashikbatmi.com/?p=1626#respond Fri, 03 Jan 2025 03:20:55 +0000 https://nashikbatmi.com/?p=1626  नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू  नाशिक प्रतिनिधी /: काल दि. 2 दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घरगुती गॅस…

The post नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू  first appeared on नाशिक बातमी.

नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

नाशिक प्रतिनिधी /: काल दि. 2 दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक क्र. (एम एच १५ एच एच २७८४) हा ट्रक ओझर कडून मालेगावकडे जात असतांना ट्रकने दुचाकी ला धडक दिल्याने हा अपघात घडला

ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत गाडीवरून तिघी जणी खाली पडल्या त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड केल्याने ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावला त्यात अर्पिता शिंदे ही डाव्या बाजूकडील मागच्या चाकात अडकल्याने जागीच मृत्युमुखी पडली तर बहिणीला आणि आईला पायाला जखम झाली.

ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अर्पिता शिंदे हीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव येथे नेण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस करत आहे.

अर्पिता शिंदे ही ओझर येथील अभिनव बाल विकास मंदिर येथे इयत्ता तिसरीत शिकत होती. तिच्या अपघाताची बातमी समजताच ओझर परिसरात शोककळा पसरली

The post नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू  first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1626 0
नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक ! https://nashikbatmi.com/?p=1620 https://nashikbatmi.com/?p=1620#respond Wed, 01 Jan 2025 11:54:21 +0000 https://nashikbatmi.com/?p=1620 नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक ! नाशिक प्रतिनिधी /: उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर…

The post नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक ! first appeared on नाशिक बातमी.

नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक !

नाशिक प्रतिनिधी /: उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच सराईत गुन्हेगार मित्रांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण गारे वय वर्ष 29 क्रांतीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली होती. दिलेल्या फिर्यादीप्रमाणे लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिझवान काझी (दोघे रा. क्रांतीनगर) यांनी थर्टी फर्स्ट’ची पार्टी करू असे सांगून त्याला सोबत नेले. आणि मद्यप्राशन करून जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली व लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला या हल्ल्यानंतर संशयित आरोपीने मोटरसायकलने पलायन केले. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुन्हे शाखेची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली.

याप्रकरणी मृताच्या चुलत भावाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने दोन पथके तयार करून सापळा रचला. पेठ रोड भागात आरोपींचा शोध घेत असतांना अरुण बापू वळवी, रिझवान रईसउद्दीन काझी आणि शुभम मिरके या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा खून त्यांचा साथीदार गणेश भावसार याच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे ) संदिप मिटके,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रोहीदास लिलके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे, चालक पवार, समाधान पवार, अनुजा येलवे, यांच्या पथकाने संयुक्त रित्या केलेली आहे.

The post नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक ! first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1620 0
नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; https://nashikbatmi.com/?p=1617 https://nashikbatmi.com/?p=1617#respond Wed, 01 Jan 2025 07:11:39 +0000 https://nashikbatmi.com/?p=1617 नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून;  नाशिक प्रतिनिधी – जगदीश वाघ :/ ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री जल्लोषाला सुरुवात…

The post नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; first appeared on नाशिक बातमी.

नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून;

नाशिक प्रतिनिधी – जगदीश वाघ :/ ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री जल्लोषाला सुरुवात झाली अन दुसरीकडे उंटवाडीरोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्या सराईत गुन्हेगार मित्रांनी मद्यपान करताना जुन्या भांडणाची कुरापत काढून डोक्यात दगड टाकून खुन केल्याची घटना 31 तारखेला रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण गारे २८, रा.क्रांतीनगर असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातील मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली. उंटवाडी रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती पाठीमागे असलेल्या मोकळ्या मैदानात मद्यप्राशन करण्यासाठी आलेले तिघांपैकी दोघांनी कुरापत काढून लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिजवान काजी (दोघे रा.क्रांतीनगर) यांनी त्याला घरातून दुचाकीने घेऊन आले. ‘थर्टी फर्स्ट’ची पार्टी करू असे सांगून त्याला उंटवाडी रोडवरील मोकळ्या मैदानात घेऊन गेले. तेथे जुन्या भांडणाची कुरापत काढून लक्ष्मणसोबत वाद घातला. एकमेकांना शिवीगाळ करत त्याच्या डोक्यात दोघांनी दगड टाकला. यामुळे तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

यानंतर दोघेही हल्लेखोर दुचाकीने घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला तातडीने गुन्हे शाखेची पथके संशयीतांच्या मागावर रवाना केली. मृतदेहचा पंचनामा करून तातडीने पोलिसांनी मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविला. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या आवरात रात्री मयत युवकच्या नातेवाईक, मित्र परिवाराने गर्दी केली होती. भावसार व काजी हे दोघेही पोलिसांच्या यादीवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही मारहाण व दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

The post नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभीच एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून; first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1617 0
सप्तशृंगी देवी मंदिर नवीन वर्षानिमित्त २ जानेवारी पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले https://nashikbatmi.com/?p=1614 https://nashikbatmi.com/?p=1614#respond Wed, 01 Jan 2025 04:32:27 +0000 https://nashikbatmi.com/?p=1614 वणी प्रतिनिधी /: साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नूतन वर्ष प्रारंभ काळात…

The post सप्तशृंगी देवी मंदिर नवीन वर्षानिमित्त २ जानेवारी पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले first appeared on नाशिक बातमी.

वणी प्रतिनिधी /: साडेतीन शक्तीपीठापैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्याने श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नूतन वर्ष प्रारंभ काळात भाविक भक्त नवीन संकल्प घेवून श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला गडावर येतात. त्यामुळे वर्षाच्या शेवटी व सुरवातीच्या कालावधीत श्रीक्षेत्री मोठ्या प्रमाणात राज्यासह परराज्यातून लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना गर्दी विरहित व योग्य नियोजनासह सुलभ दर्शन उपलब्ध होणे दृष्टीने विश्वस्त मंडळ व कार्यालयीन प्रशासनाने पूर्वनियोजन करून श्री भगवती मंदिर हे रविवार दि. ०२/०१/२०२५ भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले असणार आहे. दरम्यानच्या काळात घाटरस्ता आणि सेवासुविधा देखील पूर्ववत असेल. याची सर्व भाविक भक्तांनी योग्य ती नोंद घ्यावी. असे आवाहन विश्वस्त संस्थेचे विद्यमान विश्वस्त व कार्यालयीन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

The post सप्तशृंगी देवी मंदिर नवीन वर्षानिमित्त २ जानेवारी पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1614 0
नविन वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी भाविक गर्दी  https://nashikbatmi.com/?p=1610 https://nashikbatmi.com/?p=1610#respond Wed, 01 Jan 2025 04:09:18 +0000 https://nashikbatmi.com/?p=1610 नविन वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी भाविक गर्दी  त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:/ त्र्यंबकेश्वरला नविन वर्षानिमित्त अंदाजे 25 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, तसेच 1…

The post नविन वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी भाविक गर्दी  first appeared on नाशिक बातमी.

नविन वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी भाविक गर्दी

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी:/ त्र्यंबकेश्वरला नविन वर्षानिमित्त अंदाजे 25 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला, तसेच 1 जानेवारी ला भाविकांची अधिक गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी नेहमीप्रमाणे सकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले राहिल.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 31 डिसेंबर दुपारी दोनला परिवारासोबत दर्शनासाठी दाखल झाले.

The post नविन वर्षानिमित्त त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी भाविक गर्दी  first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1610 0
करदात्यांना दिलासा ! आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली https://nashikbatmi.com/?p=1602 https://nashikbatmi.com/?p=1602#respond Tue, 31 Dec 2024 16:18:40 +0000 https://nashikbatmi.com/?p=1602 विलंबित तसेच सुधारित आयटीआर १५ जानेवारी पर्यंत भरू शकतील. नाशिक प्रतिनिधी/: प्राप्तिकर विभागाने विलंबित/सुधारित रिटर्न (Belated or Revised ITR) भरण्याची…

The post करदात्यांना दिलासा ! आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली first appeared on नाशिक बातमी.

विलंबित तसेच सुधारित आयटीआर १५ जानेवारी पर्यंत भरू शकतील.

नाशिक प्रतिनिधी/: प्राप्तिकर विभागाने विलंबित/सुधारित रिटर्न (Belated or Revised ITR) भरण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आतापर्यंत विलंबित/सुधारित रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ होती, परंतु आता करदाते १५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांचे विलंबित/सुधारित रिटर्न भरू शकतील. या संदर्भात आयकर विभागानेही X वर पोस्ट करून निवेदन जारी केले आहे.

आतापर्यंत विलंबित/सुधारित आयटी रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ होती, परंतु आता करदाते १५ जानेवारी २०२५ पर्यंत त्यांचे विलंबित/सुधारित रिटर्न भरू शकतील. परंतु या मुदत वाढीचा फायदा केवळ निवासी वैयक्तिक करदात्यांना होणार असल्याची माहिती योगेश कातकाडे (कर सल्लागार) यांनी दिली आहे.

The post करदात्यांना दिलासा ! आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख वाढवली first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1602 0
थंडीचा कडाका पुन्हा जाणवणार, हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे https://nashikbatmi.com/?p=1599 https://nashikbatmi.com/?p=1599#respond Mon, 30 Dec 2024 04:03:43 +0000 https://nashikbatmi.com/?p=1599 नाशिक प्रतिनिधी /: वातावरणामध्ये बदल होत असून वातावरण आता कोरडे दिसत असून उत्तरेकडील भागाकडून थंड वाऱ्यांमुळे सोमवारपासून दि. ३० डिसेंबर…

The post थंडीचा कडाका पुन्हा जाणवणार, हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे first appeared on नाशिक बातमी.

नाशिक प्रतिनिधी /: वातावरणामध्ये बदल होत असून वातावरण आता कोरडे दिसत असून उत्तरेकडील भागाकडून थंड वाऱ्यांमुळे सोमवारपासून दि. ३० डिसेंबर नंतर थंडीचा जोर वाढणार आहे. रविवारी अफगाणिस्तानकडून येणाऱ्या पश्चिमी चक्रावाऱ्यामुळे काश्मीर भागात हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये किमान तापमान उणे ६ ते ७ अंश सेल्सियसपर्यंत गेले आहे. तसेच पंजाब, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणामध्ये दाट धुके तयार झाले आहे. त्यामुळे आता ढगाळ वातावरण कमी होऊन थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.तसेच ३ ते ४ जानेवारी रोजी पुन्हा नवीन पश्चिमी चक्रावाऱ्याचा अंदाज असल्याने पुन्हा हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे

The post थंडीचा कडाका पुन्हा जाणवणार, हिमवृष्टी होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता आहे first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1599 0
आदित्य सरोदे यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश https://nashikbatmi.com/?p=1590 https://nashikbatmi.com/?p=1590#respond Fri, 27 Dec 2024 13:59:16 +0000 https://nashikbatmi.com/?p=1590 खडकतर परिस्थितीवर मात करत केले यश संपादन नाशिक येथील प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट व सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष एम.…

The post आदित्य सरोदे यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश first appeared on नाशिक बातमी.

खडकतर परिस्थितीवर मात करत केले यश संपादन

नाशिक येथील प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट व सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष एम. वाय. सरोदे यांचे पुतण्या कु. आदित्य सरोदे यांनी खडतर परिस्थितीवर मात करून सीए पदवी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे.
आदित्यने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इच्छा शक्ती व अथक परिश्रम घेत हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाला असून यामध्ये आदित्य सरोदे याने सीए फायनल या परीक्षेत एक एक ग्रुप ची परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

कोरोना काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर मनोबल व आत्मविश्वास गेल्याने सीए परीक्षेकडे दुर्लक्ष झाले होते. या काळात काकांनी व आईने धीर देत पुन्हा मनोबल वाढवले त्यांच्या मार्गदर्शन व सपोर्ट मुळे पुन्हा सीए चा अभ्यास सुरू केला. परीक्षेची तयारी करतानाअभ्यासाचे सुव्यवस्थित नियोजन केले केवळ ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून ही परीक्षा उत्तीर्ण केल्याचे आदित्यने सांगितले.

नॉर्थ महाराष्ट्र ट्रॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख व कर सल्लागार योगेश कातकाडे यांनी आदित्य सरोदे यांचे या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

The post आदित्य सरोदे यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1590 0
QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड येणार! https://nashikbatmi.com/?p=1585 https://nashikbatmi.com/?p=1585#respond Mon, 09 Dec 2024 04:26:44 +0000 https://nashikbatmi.com/?p=1585 नाशिक प्रतिनिधी/ केंद्र सरकारने पॅन कार्डच्या (PAN 2.0) नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु, यासाठी पॅन कार्ड धारकांना काहीही करण्याची…

The post QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड येणार! first appeared on नाशिक बातमी.

नाशिक प्रतिनिधी/ केंद्र सरकारने पॅन कार्डच्या (PAN 2.0) नव्या आवृत्तीची घोषणा केली आहे. परंतु, यासाठी पॅन कार्ड धारकांना काहीही करण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या वतीने नवीन अपडेटेड पॅन कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर मिळणार आहे.
नवीन QR कोड असलेल्या पॅन कार्डसाठी जुन्या पॅन कार्ड धारकांना पुन्हा नव्याने वेगळा अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही; कारण पॅन क्रमांक हा कायम राहतो. मात्र, जर तुम्हाला QR कोडसह अपडेट केलेले पॅन कार्ड हवे असेल, तर तुम्ही पुनर्मुद्रणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून देऊ शकता.

पुनर्मुद्रित पॅन कार्डसाठी प्रक्रिया:
१. NSDL किंवा UTIITSL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. “Reprint PAN Card” किंवा “Change/Correction in PAN Data” या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक (जर लिंक केलेला असेल) आणि इतर माहिती भरून अर्ज सादर करा.
४. अर्ज शुल्क भरून दिलेल्या पत्त्यावर QR कोडसह नवीन पॅन कार्ड मिळवू शकता.

या QR कोडमध्ये तुमची पॅन कार्डावरील माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित केली जाते, जी भविष्यात अधिक सुरक्षिततेसाठी उपयोगी ठरते. महत्त्वाचे म्हणजे सध्य स्थितीत घडणाऱ्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांची व्याप्ती लक्षात घेता पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी जर कोणी फोन, मेसेज, लिंक किंवा ई-मेल पाठवले, तर त्याला उत्तर देऊ नका. कोणतीही माहिती किंवा OTP शेअर करू नका.

या बाबतीत पॅन धारकांनी जागरूक राहुन, सायबर फसवणुकीपासून स्वतःला जपावे अशी माहिती नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी दिली.

The post QR कोड असलेले नवीन पॅन कार्ड येणार! first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1585 0