सिडकोत अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी थेट लोकांच्या घरात.
नगरसेवक मुकेश शहाणे यांनी पुढाकार घेत लोकांच्या तक्रारी केले निवारण
नवीन नाशिक (प्रतिनिधी): नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसामुळे अतिवृष्टीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून नवीन सिडको भागात अतिवृष्टी मुळे पावसाचे पाणी थेट लोकांच्या घरात घुसून मोठे नुकसान झाले आहे. पावसाळी नाले, ड्रेनेज भरले असून त्यामधून पाणी रस्त्यावर वाहत घरात शिरले असल्याच्या अनेक तक्रारी प्रभाग क्रमांक २९ मधील नागरिकांनी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडे केल्या. परिस्थितीचे गांभीर्य बघता सदर तक्रारींची तत्काळ दखल घेत नगरसेवक मुकेश शहाणे यांनी संपूर्ण प्रभागाचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरून विविध भागातील नागरिकांच्या भेटी घेऊन तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेचे अभियंता, कर्मचारी, संबंधित ठेकेदार व प्रेशर गाडी बोलून तक्रारींचे ताबडतोब निवारण करून समस्या सोडवण्यासाठी सूचना केल्या.
धडाकेबाज अशी कार्यशैलीतील नगरसेवक अशी ओळख असलेले मुकेश शहाणे यांच्यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केल्याने
केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.