धक्कादायक.! नाशिक मध्ये व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्याः

नाशिक मध्ये व्यावसायिकाची पत्नीसह आत्महत्याः टिळकवाडी भागातील बंगल्यात दाम्पत्याने रात्री विष सेवन करून संपवले जीवन

दोघा मुलांसोबत रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर घरात दोघेच असलेल्या व्यावसायिकाने आपल्या पत्नीसहविषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना टिळकवाडीतील ‘यशोकृपा’ याबंगल्यात घडली. हा प्रकार सोमवारीसकाळच्या दरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पोलिसांनी व्हिसेरा राखूनठेवला आहे.

जयेश रसिकलाल शहा (५८) व त्यांची पत्नी रक्षा जयेश शहा (५६) असे आत्महत्या केलेल्यादाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, टिळकवाडीतीलरहिवासी तथा एफएमसीजीव्यावसायिक असलेल्या या दोघांनीजीवनयात्रा संपविल्याचा प्रकार समोर आला आहे. शहा दाम्पत्याने आपल्यादोघा मुलांसमवेत रविवारी (दि. ५) रात्री नेहमीप्रमाणे १० वाजेच्या सुमारासजेवण केले. त्यानंतर दोघेही मुले त्यांच्या कामासाठी बाहेर गेले. त्यानंतर शहा पती-पत्नी त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यानंतर तासाभराने साधारणतः ११.३० वाजेच्या सुमारास रक्षा शहा यांनी आपला मोठा मुलगा कौशल यास फोन केला. फोनवर त्या तुटक आणि अडखळत घाबरलेल्या स्थितीत बोलत असल्याचे कौशलच्या लक्षात आले. फोन ठेवताच मुलाने घरी धाव घेतली असता त्याला खोलीत दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्याने लागलीच दोघांना कारमधून नेत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.

मात्र, प्रकृती खालावल्याने दोघांनाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारार दम्यान पहाटे दोघांचामृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *