नाशिक: चांदवड घाटात आठ ते दहा वाहनांचा भीषण अपघात

नाशिक: चांदवड घाटात आठ ते दहा वाहनांचा भीषण अपघात

नाशिक: चांदवड घाटात ८ ते १० वाहनांचा भीषण अपघात एक महिला ठार : 20 ते 22 जण गंभीर जखमी

चांदवड प्रतिनिधी:/ नाशिक-चांदवडच्या राहुड घाटात एक भीषण अपघात झाला आहे. या घाटात ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. अपघात एक महिला ठार तर २० ते २२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

एका वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात झाला आहे.

जखमींवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाट उतरत असताना हा अपघात झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अपघातामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं समोर आलं आहे. स्थानिक नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

घाट उतरताना एका वाहनाचा ब्रेक फेल झाला. त्याने पुढे असलेल्या वाहनाला ठोकले, तो जोरात पुढे गेला आणि त्याने अनेक वाहनांना धडक दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *