अंबड भागातील ‘श्री ज्वेलर्स’ दरोड्यातील मुख्य सूत्रधारास हरयाणातून अटक !

अंबड भागातील ‘श्री ज्वेलर्स’ दरोड्यातील मुख्य सूत्रधारास हरयाणातून अटक !

नाशिक प्रतिनिधी/: अंबड पोलिस ठाणे हद्दीतील ‘श्री ज्वेलर्स’ या सराफी दुकानांमध्ये आठवडाभरापूर्वी भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून लूट करण्यात आली होती. या लुटीचा मुख्य सूत्रधारअसलेला संशयित नरेंद्र हरीराम अहिरराव वय २५, रा. जि. करवाडा गाव, म. प्रदेश यास हरयाणात गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून बेड्या ठोकल्या.

 सोमवारी दि. १७ दुचाकीस्वार तिघा लुटारूंनी लूट केली होती. याप्रकरणी दोन संशयीत आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखा गुंडाविरोधी पथकाने मास्टरमाइंडचा शोध घेतला असता त्याचे ‘लोकेशन’ थेट हरयाणात आढळून आले. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गोपनीय माहितीची खात्री पटविली. याबाबत उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांना माहिती कळविली. त्यांनी त्वरित मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांचे पथक तयार करून हरयाणा गाठले. पथकाने सापळा रचून शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचे दागिने हस्तगत करण्यात आले नाही. पुढील तपासाकरिता नरेंद्र यास अंबड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उप निरीक्षक मलंग गुंजाळ, दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, सुनिल आडके, प्रदिप ठाकरे, भुषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, अशोक आघाव, सुनिता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *