विद्यार्थ्यांना मिठाई, भोजनाची मेजवानी देत मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवस उत्साह साजरा

विद्यार्थ्यांना मिठाई, भोजनाची मेजवानी देत मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवस उत्साह साजरा

सिडको प्रतिनिधी:/ महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व दुग्ध विकास मंत्री, संघर्ष कन्या रणरागिणी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त अचानक चौक जुने सिडको येथील पडसाद कर्णबधिर विद्यालयात दिव्यांग मुलांना मिठाई व भोजनाची मेजवानी देत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन दिव्यांग आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे व युवा मोर्चाचे अध्यक्ष रोहन कानकाटे यांनी केले होते. यावेळी आ सिमाताई महेश हिरे, भाजपा शहर अध्यक्ष सुनिलजी केदार यांची विशेष उपस्थिती लाभली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सुचिता सैदाणकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांच्या स्वागत करत सत्कार केला. भाजपा शहर अध्यक्ष सुनिल केदार यांनी मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या राजकीय संघर्षाविषयी व कार्याविषयी माहिती देताना सांगितले की, मुंढे घराण्याला कायमच संघर्ष करावा लागला आहे. अनेक अडचणींना सामोरे जात संघर्ष करत पंकजाताई आज मंत्रिपदावर विराजमान आहेत. त्यांचा जीवनप्रवास हा सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांग बाळासाहेब घुगे यांनी अथक परिश्रम घेत हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार व कौतुक केले.

 

आ सीमाताई हिरे यांनी पंकजाताई मुंडे यांच्या जीवन प्रवास अतिशय जवळून बघितला असून महिला असूनही त्यांनी कशाप्रकारे संघर्ष करत यशस्वी वाटचाल केली याविषयी माहिती दिली. बाळासाहेब घुगे हे स्वतः दिव्यांग असताना समाजासाठी अतिशय तळमळीने कार्य करत आहे त्यांच्या या कार्याबद्दल बोलयाला शब्द कमी पडतील असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घुगे यांनी केले होते आभार दशरथ गांगुर्डे यांनी मानले. यावेळी सरचिटणीस नाना शिलेदार, रेशमी ताई हिरे बेडाळे, मंडल अध्यक्ष राहुल गणोरे, नगरसेविका छाया ताई देवांग, महिला मोर्चाच्या अध्यक्षा छाया ताई परेवाल, न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे, सरचिटणीस प्रविण सोनवणे, प्रविण मोरे, तेजस गीते, उत्तम काळे, योगेश मोरे, परमानंद पाटील, बी के नागरे सर, रंगनाथ दरगुडे, शरद जाधव, अरुण गव्हाणे, जितु पाटील, सार्थक सोनवणे, मंगल माळी, निखिल बडगुजर, सुरज निकुंभ, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *