–II ● विवेक विचार ● II–
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३६७ वा दिवस
कोणत्याही विधि-निषेधाद्वारे मुक्तिलाभ होणे शक्य नाही. तुम्ही सदा – नित्यमुक्तस्वरूप आहात. जर तुम्ही आधीपासूनच मुक्तच आहात स्वभावतःच – मुक्त नसाल, तर तुम्हाला काहीच मुक्ती देऊ शकणार नाही. आत्मा हा स्वप्रकाश आहे, स्वयंज्योती आहे. कार्य-कारण संबंध आत्म्याला स्पर्श शकत नाही, आणि ह्या विदेह अवस्थेचेच नाम आहे मुक्ती. ब्रह्म सर्वातीत आहे – जे होते, जे आहे, आणि जे होईल त्या साऱ्याच्या ते पलीकडचे आहे – ते भूत, वर्तमान आणि भविष्य ह्या तिन्ही काळांच्या ‘पल्याड’ आहे, कालत्रयातीत आहे. मुक्ती ही जर कोणत्याही एखाद्या कर्माचे ‘फल’ असती तर तिला काहीच मूल्य राहिले नसते, ती मग एक संयुक्त वा संमिश्र वस्तूच झाली असती, आणि तिचे स्वरूप खरोखरच जर तसे असेल तर तिच्या ठायी बंधनाचे बीज विद्यमान आहे असेच म्हणावे लागेल. मुक्ती हाच आत्म्याचा खरा, एकमेव नित्य धर्म आहे तीच आत्म्यासंबंधीचे एकमेव सत्य होय.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
*★ भारतीय सौर श्रावण २८ शके १९४८*
★ श्रावण शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ बुधवार दि. १९ ऑगस्ट २०२६
★ १९१८ काँग्रेस नेते, भारताचे नववे राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांचा जन्मदिन.
★ १९७५ शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, कुशल संघटक, लेखक, पत्रकार आणि ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक विश्वनाथ तथा अप्पासाहेब पेंडसे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक छायाचित्रण दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक