The post आदित्य सरोदे यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश first appeared on नाशिक बातमी.

]]>नाशिक येथील प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट व सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष एम. वाय. सरोदे यांचे पुतण्या कु. आदित्य सरोदे यांनी खडतर परिस्थितीवर मात करून सीए पदवी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे.
आदित्यने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इच्छा शक्ती व अथक परिश्रम घेत हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाला असून यामध्ये आदित्य सरोदे याने सीए फायनल या परीक्षेत एक एक ग्रुप ची परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.
कोरोना काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर मनोबल व आत्मविश्वास गेल्याने सीए परीक्षेकडे दुर्लक्ष झाले होते. या काळात काकांनी व आईने धीर देत पुन्हा मनोबल वाढवले त्यांच्या मार्गदर्शन व सपोर्ट मुळे पुन्हा सीए चा अभ्यास सुरू केला. परीक्षेची तयारी करतानाअभ्यासाचे सुव्यवस्थित नियोजन केले केवळ ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून ही परीक्षा उत्तीर्ण केल्याचे आदित्यने सांगितले.

The post आदित्य सरोदे यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश first appeared on नाशिक बातमी.

The post शाळा महाविद्यालय इमारतीवरील मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात first appeared on नाशिक बातमी.

]]>नाशिक प्रतिनिधी :/ शाळा महाविद्यालय इमारतीवरील मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या लहरीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून हे धोकादायक मोबाईल टॉवर त्वरित काढण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल याबाबतचे निवेदन आज नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयात देण्यात आले.

The post शाळा महाविद्यालय इमारतीवरील मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात first appeared on नाशिक बातमी.

The post युवा मंच व विराट मित्र मंडळाच्या वतीने १०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव first appeared on नाशिक बातमी.

]]>करियर मार्गदर्शक योगेश बहेती यांनी आपल्या अनोख्या पद्धतीने मुलांना करिअर मार्ग निवडताना आपले व्यक्तिमत्व, कौशल्य, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, वास्तव घडामोडी याचे ज्ञान आत्मसात करून आवडीचे क्षेत्र निवडा. शिक्षण घेत असताना कौशल्याधिष्टित अभ्यासक्रम प्रॅक्टिकल ज्ञानावर भर नक्कीच तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही या शब्दात मुलांशी संवाद साधला. सामाजिक कार्यकर्ते जय कोतवाल, रमिज पठाण यांचे सामाजिक कार्य खूप मोठे असून गुणवंत उत्तीर्ण सर्वच १०० विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी थाप देवून पुढील आयुष्यात उभारी देणारा हा उपक्रम समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे करियर मार्गदर्शक योगेश बहेती, मास्टर ट्रेनर असिफ शेख, के बी एच विद्यालय वडाळाचे मुख्याध्यापक संजय म्हसकर, समुपदेशक सचिन साळवे, आयोजक सामाजिक कार्यकर्ते जय कोतवाल, रमिज पठाण, आदी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाखी सोनार तर आभारप्रदर्शन रमिज पठाण यांनी केले. यावेळी १०० विद्यार्थ्याना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

The post युवा मंच व विराट मित्र मंडळाच्या वतीने १०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव first appeared on नाशिक बातमी.

The post प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धडपड first appeared on नाशिक बातमी.

]]>शासनाच्या नियमात होणारे बदल व कॉलेज प्रशासनाकडून कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होईपर्यंत ऍडमिशन होत नसल्याने विद्यार्थी व पालक वर्गाला नाशिक सेतू व प्रांत कार्यालयात वारंवार चक्रा मारावा लागत आहे. वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक वर्गाकरून या कामकाजाचा निषेध व्यक्त होत आहे तसेच सेतू कार्यालय मध्ये अनेक प्रकारचे एजंट कार्यरत असतात या एजंट मार्फत प्रमाणपत्र अर्ज सादर केल्यास लवकर काम होते अशी माहिती समोर येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. प्रत्यक्षात शासनाने सर्वांच्या सोयीकरिता अनेक ठिकाणी आपले सरकार केंद्र स्थापन केलेले असून सर्व संगणकीय प्रक्रिया असताना देखील दाखल्यांकरिता उशीर होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होऊन त्यास कोण जबाबदार असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
– विजय महाले, पालक
मी माझ्या मुलीचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र करिता अर्ज दिला होता आज दहा दिवस होऊन अधिक वेळ झालेला आहे अद्यापमाला प्रमाणपत्र मिळालेले नाही मी मागील तीन चार दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. दि ६ जून रोजी डेक्स एक व दोन वरून अर्ज पुढे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील दिवशी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित होते तरी देखील अजून मिळालेले नाही. यानंतर मी प्रांत ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन विनंती केल्यानंतर त्यांनी पुढील प्रोसेस केली तरी देखील अजून प्रमाणपत्र उपलब्ध झालेले नाही. ही कार्यपद्धती पारदर्शक नसून केवळ जो पाठपुरावा करेल व प्रांत ऑफिसमध्ये जाईल अशाच लोकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे का.
सरकारी कामांमध्ये अर्ज सादर केल्यानंतर त्यावर पुढील चार-पाच दिवसात कारवाई होणे अपेक्षित आहे अशा सूचना असतानाही दहा दहा दिवस होऊन प्रमाणपत्र मिळत नाही. काही लोक या ठिकाणी येऊन एकच व्यक्ती पाच पाच दहा लोकांची नावे देऊन संबंधित प्रमाणपत्र प्रोसेस करून घेतात यामुळे या कामकाजात पारदर्शकता नसल्याचे दिसून येत आहे मग आम्ही देखील त्याच लोकांमार्फत प्रमाणपत्र मिळवायचे का ? आम्ही आमची ड्युटी सोडून या ठिकाणी वारंवार चकरा मारत असून आमचे आर्थिक नुकसानही होत आहे. याबाबत कठोर पावले उचलून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य पद्धतीने कामकाज होणे आवश्यक आहे.

The post प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धडपड first appeared on नाशिक बातमी.