Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
आदित्य सरोदे यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश - नाशिक बातमी

आदित्य सरोदे यांचे सीए परीक्षेत घवघवीत यश

खडकतर परिस्थितीवर मात करत केले यश संपादन

नाशिक येथील प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंट व सीए इन्स्टिट्यूट नाशिक शाखेचे माजी अध्यक्ष एम. वाय. सरोदे यांचे पुतण्या कु. आदित्य सरोदे यांनी खडतर परिस्थितीवर मात करून सीए पदवी परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे.
आदित्यने सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून इच्छा शक्ती व अथक परिश्रम घेत हे घवघवीत यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच दि. २६ डिसेंबर २०२४ रोजी जाहीर झाला असून यामध्ये आदित्य सरोदे याने सीए फायनल या परीक्षेत एक एक ग्रुप ची परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

कोरोना काळात वडिलांचे निधन झाल्यानंतर मनोबल व आत्मविश्वास गेल्याने सीए परीक्षेकडे दुर्लक्ष झाले होते. या काळात काकांनी व आईने धीर देत पुन्हा मनोबल वाढवले त्यांच्या मार्गदर्शन व सपोर्ट मुळे पुन्हा सीए चा अभ्यास सुरू केला. परीक्षेची तयारी करतानाअभ्यासाचे सुव्यवस्थित नियोजन केले केवळ ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून ही परीक्षा उत्तीर्ण केल्याचे आदित्यने सांगितले.

नॉर्थ महाराष्ट्र ट्रॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशनचे जनसंपर्क प्रमुख व कर सल्लागार योगेश कातकाडे यांनी आदित्य सरोदे यांचे या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *