प्रतिनिधी :/ नुकतेच दहावी-बारावीचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांना पुढील वर्गाच्या ऍडमिशन करिता विविध प्रकारची शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र सादर करावी लागतात.
शासनाच्या नियमात होणारे बदल व कॉलेज प्रशासनाकडून कागदपत्रांची पूर्तता पूर्ण होईपर्यंत ऍडमिशन होत नसल्याने विद्यार्थी व पालक वर्गाला नाशिक सेतू व प्रांत कार्यालयात वारंवार चक्रा मारावा लागत आहे. वेळेत प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी व पालक वर्गाकरून या कामकाजाचा निषेध व्यक्त होत आहे तसेच सेतू कार्यालय मध्ये अनेक प्रकारचे एजंट कार्यरत असतात या एजंट मार्फत प्रमाणपत्र अर्ज सादर केल्यास लवकर काम होते अशी माहिती समोर येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे. प्रत्यक्षात शासनाने सर्वांच्या सोयीकरिता अनेक ठिकाणी आपले सरकार केंद्र स्थापन केलेले असून सर्व संगणकीय प्रक्रिया असताना देखील दाखल्यांकरिता उशीर होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होऊन त्यास कोण जबाबदार असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
– विजय महाले, पालक
मी माझ्या मुलीचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र करिता अर्ज दिला होता आज दहा दिवस होऊन अधिक वेळ झालेला आहे अद्यापमाला प्रमाणपत्र मिळालेले नाही मी मागील तीन चार दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. दि ६ जून रोजी डेक्स एक व दोन वरून अर्ज पुढे पाठवण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील दिवशी प्रमाणपत्र मिळणे अपेक्षित होते तरी देखील अजून मिळालेले नाही. यानंतर मी प्रांत ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन विनंती केल्यानंतर त्यांनी पुढील प्रोसेस केली तरी देखील अजून प्रमाणपत्र उपलब्ध झालेले नाही. ही कार्यपद्धती पारदर्शक नसून केवळ जो पाठपुरावा करेल व प्रांत ऑफिसमध्ये जाईल अशाच लोकांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे का.
सरकारी कामांमध्ये अर्ज सादर केल्यानंतर त्यावर पुढील चार-पाच दिवसात कारवाई होणे अपेक्षित आहे अशा सूचना असतानाही दहा दहा दिवस होऊन प्रमाणपत्र मिळत नाही. काही लोक या ठिकाणी येऊन एकच व्यक्ती पाच पाच दहा लोकांची नावे देऊन संबंधित प्रमाणपत्र प्रोसेस करून घेतात यामुळे या कामकाजात पारदर्शकता नसल्याचे दिसून येत आहे मग आम्ही देखील त्याच लोकांमार्फत प्रमाणपत्र मिळवायचे का ? आम्ही आमची ड्युटी सोडून या ठिकाणी वारंवार चकरा मारत असून आमचे आर्थिक नुकसानही होत आहे. याबाबत कठोर पावले उचलून विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी योग्य पद्धतीने कामकाज होणे आवश्यक आहे.