मोबाईल टॉवर न काढल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार) जनआंदोलन करणार
नाशिक प्रतिनिधी :/ शाळा महाविद्यालय इमारतीवरील मोबाईल टॉवर मधून निघणाऱ्या लहरीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून हे धोकादायक मोबाईल टॉवर त्वरित काढण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल याबाबतचे निवेदन आज नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयात देण्यात आले.
नाशिक शहरातील शाळा व महाविद्यालयाच्या अनेक इमारतीवर मोबाईल इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे टॉवर आहे. शाळा व महाविद्यालयात सकाळ – दुपारच्या सत्रात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या टॉवर मधून बाहेर पडणाऱ्या लहरींमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यवर विपरीत परिणाम होत आहे. इमारतीवरील मोबाईल टॉवरमुळे सर्व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळायचा कार्यक्रम शहरातील शाळांनी सुरू केला आहे. विद्यार्थ्यांचा आरोग्याच्या विचार न करता अनेक शाळा- महाविद्यालयावर मोबाइल टॉवर बसविण्यात आलेले आहेत. मनपा नगररचना विभाग व शिक्षण विभागाकडून कडून ह्या शाळांना परवानगी कशी काय दिली गेली याची चौकशी करण्यात यावी तसेच नाशिक महापालिका हद्दीतील सर्व शाळा महाविद्यालयाची तपासणी करून त्वरित हे सर्व अनधिकृत मोबाईल टावर काढण्यात यावे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) नाशिक शहराध्यक्ष भावनेश राऊत, जिल्हाध्यक्ष ऍड तुषार जाधव, संकेत गायकवाड, प्रदेश सचिव रमीज पठान, सुनील घुगे आदी उपस्थित होते.
सुनील घुगे – शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक
सिडकोतील एका शाळेत नुकतीच एक मोठी घटना घडली असून इ. ६ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीला वर्गात चक्कर आली त्यानंतर लगेचच तिने आपले प्राण सोडले. या शाळेच्या इमारतीवर तीन मोबाईल टॉवर आहेत. याचे मानवी शरीरावर वाईट परिणाम होत असून विद्यार्थ्यांना डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे समजते आहे. या टॉवरच्या लहरींचा परिणामामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांवरील मोबाईल टॉवर त्वरित काढण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा व आरोग्याचा विचार करावा अन्यथा मोठ्या प्रमाणावर जन आंदोलन करण्यात येईल.