नाशिक प्रतिनिधी :/ वडाळा गाव तेथील युवा मंच व विराट मित्र मंडळा यांच्या वतीने प्रभाग ३० वडाळा परिसरातील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी करियर विषयक मौलिक मार्गदर्शन करतांना असिफ शेख यांनी मुलांशी संवाद साधला; करिअर निवडताना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा ज्यात तुम्ही निश्चितपने स्वतः ला यशस्वी करू शकाल. कमी गुण मिळाले किंवा नापास झाले म्हणून खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा. प्रामाणिक प्रयत्न, चिकाटी व जिद्द असल्यास नक्कीच यशस्वी संपादन करू शकाल. अपयश हि यशाची पहिली पायरी असते अशी अनेक उदारणे आपण पहिली आहेत; दहावीत अपयश मिळविलेले आज मोठे अधिकारी आहेत.
करियर मार्गदर्शक योगेश बहेती यांनी आपल्या अनोख्या पद्धतीने मुलांना करिअर मार्ग निवडताना आपले व्यक्तिमत्व, कौशल्य, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, वास्तव घडामोडी याचे ज्ञान आत्मसात करून आवडीचे क्षेत्र निवडा. शिक्षण घेत असताना कौशल्याधिष्टित अभ्यासक्रम प्रॅक्टिकल ज्ञानावर भर नक्कीच तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही या शब्दात मुलांशी संवाद साधला. सामाजिक कार्यकर्ते जय कोतवाल, रमिज पठाण यांचे सामाजिक कार्य खूप मोठे असून गुणवंत उत्तीर्ण सर्वच १०० विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी थाप देवून पुढील आयुष्यात उभारी देणारा हा उपक्रम समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे करियर मार्गदर्शक योगेश बहेती, मास्टर ट्रेनर असिफ शेख, के बी एच विद्यालय वडाळाचे मुख्याध्यापक संजय म्हसकर, समुपदेशक सचिन साळवे, आयोजक सामाजिक कार्यकर्ते जय कोतवाल, रमिज पठाण, आदी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाखी सोनार तर आभारप्रदर्शन रमिज पठाण यांनी केले. यावेळी १०० विद्यार्थ्याना सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.