अंबड पोलिसांनी सतर्कमुळे युवकाचे वाचले प्राण
नाशिक बातम्यांसाठी जॉईन व्हाट्सअप ग्रुप
नवीन नाशिक प्रतिनिधी /: घरातील वादाला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणांनी सोमवारी दि.१० जून रोजी थेट अंबड पोलिस ठाण्यात येऊन विष सेवन करीत आत्महत्येचा करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संबंधित तरुणा जवळील विषाची बाटली त्वरित त्याच्या हातातून हिसकावून घेतली. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मोरवाडी गावात राहणाऱ्या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सोमवारी दुपारी अंबड पोलिस ठाण्यात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. यादरम्यान दुपारी ४ वाजेच्या सुमारास तरुण पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार या कक्षात येताच त्याने त्याच्याकडे असलेले काही तरी विषारी औषध सेवन करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी कक्षात उपस्थित असलेले पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान राखत युवकाच्या हातातील विषारी औषध असल्याची बाटली हिसकावून घेत त्याला ताब्यात घेतले.
युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत युवकाला गुन्हे शोध पथकाचे घनश्याम भोये, किरण गायकवाड यांनी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर करीत आहे.