नॉर्थ महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या जनसंपर्क प्रमुख पदी योगेश कातकाडे

नॉर्थ महाराष्ट्र कर सल्लागार संघटनेच्या जनसंपर्क प्रमुख पदी योगेश कातकाडे

नाशिकच्या बातम्यांसाठी जॉईन व्हाट्सअप ग्रुप

प्रतिनिधी:/ नवीन नाशिक येथील कर सल्लगार योगेश भास्कर कातकाडे यांचे संस्थेतील व इतर सामाजिक, व्यवसायिकांकरिता केलेल्या विविध उल्लेखनीय कार्याची दखल घेत नॉर्थ महाराष्ट्र कर सल्लागार संस्थेच्या जनसंपर्क प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली.

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाची नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सन २०२४-२५ करिता नाशिककरांना मोठी जबाबदारी देत कर सल्लागार श्री योगेश कातकाडे यांची जनसंपर्क प्रमुख या महत्त्वाच्या पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

कर सल्लागार व्यवसायिक म्हणून अनेक लोक कामकाज करत असतात यात शहरांसोबतच ग्रामीण भागातील व्यवसायिकांचाही मोठा सहभागा आहे. या सर्वांना संघटनेत सामावून घेत संघटित करणार आहोत. त्याचबरोबर संघटनेची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर अधिक मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहोत. कर कायद्याविषयक उद्भवणाऱ्या कायदेशीर व प्रशासकीय समस्या प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

संस्थेच्या वतीने सभासदांचे, करदात्यांचे हित जोपासले जाणार आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांविषयीचे अद्ययावत ज्ञान अवगत करून देण्याबरोबरच दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. अधिक माहिती साठी मो. ९८८१८४३६१७ यावर संपर्क साधावा.

– योगेश कातकाडे (कर सल्लागार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *