Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
काचुर्ली आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा - नाशिक बातमी

काचुर्ली आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

काचुर्ली आश्रमशाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांची बैलगाडीतून पारंपरिक मिरवणूक

नाशिकच्या सर्व बातम्यांसाठी जॉईन व्हाट्सअप ग्रुप

(प्रतिनिधी) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्राथमिक आश्रमशाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शाळा परिसर व वर्ग सजावट करण्यात आलेली होती. सुरुवातीला उपस्थित विद्यार्थ्यांची शिक्षणाचे महत्त्व सांगणारे घोषवाक्यांच्या फलकासह तसेच नवागतांची बैलगाडीतून प्रभातफेरी काढण्यात आली. याप्रसंगी शाळेत प्रवेश करताना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यानंतर शाळेतील नवागतांसाठी पहिलं पाऊलं हा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे तसेच शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कलाकृतींचे हस्तकला-चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केलेले होते. याप्रसंगी पालक मेळावाही संपन्न झाला. पालक मेळाव्याप्रसंगी पालक विष्णू भुसारे, पवन जाधव यांनी पालकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षक नवनाथ ठाकरे व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक कार्यालयाचे संपर्क अधिकारी भाऊसाहेब भोर यांनी विद्यार्थी व पालकांना विद्यार्थी उपस्थिती, शिक्षणाचे फायदे तसेच शालेय कामकाज याविषयी मार्गदर्शन केले व पहिल्याच दिवशी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मुक्ताताई बांगरे, प्रमुख पाहुणे प्रकल्प कार्यालयाचे संपर्क अधिकारी भाऊसाहेब भोर, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक गौतम कटारे यांसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप लाहोरे, सचिन शेवाळे,हेमंत इंपाळ, सविता गायखे, गायत्रीदेवी पाटील, नीता कुवर, मीना साळवे, अविनाश भिसे आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता गायखे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *