Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
काचुर्ली आश्रमशाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत - नाशिक बातमी

काचुर्ली आश्रमशाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

प्रतिनिधी  /: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काचुर्ली येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या प्राथमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता-५ वी) २०२४ ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे. यामध्ये शाळेचे १२ पात्र विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये हेमराज बदादे , जयश्री निरगुडे, गोरख खेडुलकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना पुढील तीन वर्षाकरिता प्रतिमाह ₹५००/- प्रमाणे (₹५००० प्रतिवर्ष) शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक नवनाथ ठाकरे तसेच सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, पदाधिकारी, नाशिक ग्रामीणचे संचालक रमेश (आबा) पिंगळे, तसेच शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे, मुख्याध्यापक गौतम कटारे, शाळा व्यवस्थापन समिती, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *