नाशिक: बसच्या धडकेमध्ये मोटरसायकल वरील युवक ठार; काठेगल्ली सिग्नल येथील घटना 

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक (प्रतिनिधी): परिवहन महामंडळाच्या बसने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली या मध्ये २३ वर्षीय युवक ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली.नाशिक-पुणे महामार्गावरील काठेगल्ली सिग्नल येथे भरधाव वेगातील परिवहन महामंडळाच्या बसने मोटरसायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये पाठीमागे बसलेला राहुल ज्ञानेश्वर उर्फ नाना बेंडकुळे (२३, रा शिवाजीवाडी, वडाळा-पाथर्डी रोड) या युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्याचे अंमलदार शरद अर्जून देवरे यांच्या फिर्यादीनुसार, मोटर सायकल चालक आकाश अरुण वार्डे, राम नाना वाघ व राहुल बेंडकुळे हे तिघे गाडी क्रमांक एमएच १५ जेजी २१६३ वरून बनकर चौकाकडून नागजी चौकाकडे येत होत

त्याचवेळी नाशिकरोडकडून भरधाव वेगात परिवहन महामंडळाची बस एमएच ०४ एलक्यु ९४५८ येत होती. काठेगल्ली सिग्नल येथे मोटर सायकल वाहन रस्ता ओलांडत असतानाच, भरधाव वेगातील बसने मोपेडला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये आकाश व राम यांना किरकोळ दुखापत झाली. तर पाठीमागे बसलेला राहुल गंभीररित्या जखमी झाला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

तर याप्रकरणी बसचालक शरद अर्जून देवरे (रा. नागापूर रोड, ता. नांदगाव) यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक वाघ हे तपास करीत आहेत


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *