विवाहितेला मारहाण करत विषारी औषध पाजले…नेमके कारण काय वाचा सविस्तर

नाशिक प्रतिनिधी : कपडे धुण्यास नकार दिला म्हणून विवाहितेला मारहाण करून विष पाजण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये देवळाली येथे घडला आहे. याप्रकरणी पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता ही दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास देवळाली गाव येथील जगताप मळा परिसरात सासरी नांदत होती. त्यावेळी तिची नणंद काही गोण्या भरून कपडे धुण्यासाठी घेऊन आली व जेवण करून ती निघून गेली.

हे कपडे तिच्या सासूने विवाहितेला धुण्यास सांगितले; मात्र विवाहितेच्या हाताला लागलेले असल्यामुळे तिने कपडे धुण्यास नकार दिला. त्यानंतर सासूने तिच्याशी भांडण केले, तसेच तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. त्यानंतर पती व सासूने मिळून विवाहितेला मारहाण केली, त्यानंतर सासू व पतीने विवाहितेला बळजबरीने विषारी औषध पाजले. तिला अस्वस्थ वाटू लागल्याने तिच्या पतीने औषधोपचारासाठी जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *