नाशिक पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, डोक्यात दगड टाकून खून; आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक !
नाशिक प्रतिनिधी /: उंटवाडी रोडवरील क्रांतीनगर भागात एका सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच सराईत गुन्हेगार मित्रांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. लक्ष्मण गारे वय वर्ष 29 क्रांतीनगर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या घटनेने खळबळ उडाली होती. दिलेल्या फिर्यादीप्रमाणे लक्ष्मण हा घरी असताना रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित गणेश नितीन भावसार व रिझवान काझी (दोघे रा. क्रांतीनगर) यांनी थर्टी फर्स्ट’ची पार्टी करू असे सांगून त्याला सोबत नेले. आणि मद्यप्राशन करून जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली व लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला या हल्ल्यानंतर संशयित आरोपीने मोटरसायकलने पलायन केले. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. गुन्हे शाखेची पथके संशयितांच्या मागावर रवाना झाली.
याप्रकरणी मृताच्या चुलत भावाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने दोन पथके तयार करून सापळा रचला. पेठ रोड भागात आरोपींचा शोध घेत असतांना अरुण बापू वळवी, रिझवान रईसउद्दीन काझी आणि शुभम मिरके या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा खून त्यांचा साथीदार गणेश भावसार याच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे ) संदिप मिटके,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, नाझीम पठाण, योगीराज गायकवाड, देविदास ठाकरे, रोहीदास लिलके, धनंजय शिंदे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे, चालक पवार, समाधान पवार, अनुजा येलवे, यांच्या पथकाने संयुक्त रित्या केलेली आहे.
हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवागाडी पार्किंगच्या वादातून सोसायटीतीलच इतर रहिवाशांमध्ये झालेल्या वादात एकाचा मृत्यू नाशिक प्रतिनिधी :/ किरकोळ कारणावरून काल…