Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू  - नाशिक बातमी

नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू 

 नाशिक: ट्रकची दुचाकीला धडक; आठ वर्षीय मुलीचा मृत्यू 

नाशिक प्रतिनिधी /: काल दि. 2 दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर भरलेला ट्रक क्र. (एम एच १५ एच एच २७८४) हा ट्रक ओझर कडून मालेगावकडे जात असतांना ट्रकने दुचाकी ला धडक दिल्याने हा अपघात घडला

ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत गाडीवरून तिघी जणी खाली पडल्या त्यानंतर नागरिकांनी आरडाओरड केल्याने ट्रक ड्रायव्हरने ब्रेक लावला त्यात अर्पिता शिंदे ही डाव्या बाजूकडील मागच्या चाकात अडकल्याने जागीच मृत्युमुखी पडली तर बहिणीला आणि आईला पायाला जखम झाली.

 ट्रक चालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अर्पिता शिंदे हीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपळगाव येथे नेण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस करत आहे.

 अर्पिता शिंदे ही ओझर येथील अभिनव बाल विकास मंदिर येथे इयत्ता तिसरीत शिकत होती. तिच्या अपघाताची बातमी समजताच ओझर परिसरात शोककळा पसरली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *