म्हसरूळ पोलीस हद्दीतील खूनाचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये लावला तपास
नाशिक प्रतिनिधी: म्हसरूळ पोलीस हद्दीतील प्रशांत तोडकर या युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता, हा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासामध्ये उघडकीस आणला असून चार आरोपींना गजाआड केले आहे. गुन्हेशाखा युनिट क १ चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना सी.सी.टी.व्ही फुटेज च्या आधारे शोध लावत आरोपींना पिंपरी चिंचवड येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
य़ा प्रकरणात विजय दत्तात्रय आहेर रामवाडी, प्रशांत निंबा हादगे पेठरोड, संकेत प्रदिप गोसावी पंचवटी, कुणाल कैलास या चार आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केल्यानंतर विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्या काही दिवसापूर्वी शाब्दीक वाद झाला होता. १५ जून रोजी शाब्दीक वादाचे रूपांतर भांडणात झाले प्रशांत तोडकर यांच्या डोक्यात दगड घालुन खून केला असल्याचे सांगून गुन्हयाची कबुली दिली.
सदरची कामगीरी पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव (पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा), संदिप मिटके (सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक), यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा विशाल काठे, प्रविण वाघमारे, नाझिमखान पठाण, महेश साळुंके, धनंजय शिंदे पोना प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोअ विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, चासपोउनि किरण शिरसाठ यांनी केलेली आहे.