अंबड भागातील डीजीपीनगरच्या श्री ज्वेलर्स लूट प्रकरणातील आरोपीला अटक
अन्य दोघांच्या तपासासाठी पथक रवाना, मुद्देमाल हस्तगत करण्यात यश
सिडको प्रतिनिधी व जगदीश वाघ:/ अंबड परिसरातील कामटवाडे रोड परिसरातील सोमवारी श्री ज्वेलर्स या दुकानावर भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी तब्बल 25 ते 30 तोळे सोने लंपास केले होते. अखेर या सशस्त्र दरोड्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. दरोडा प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी हे अद्यापही फरार आहेत. त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल, असा विश्वास गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे.
सोमवारी दि. 17 फेब्रुवारी रोजी दीड वाजेच्या सुमारास कामटवाडे रोडवर माऊली लॉन्स च्या जवळ श्री ज्वेलर्स या ठिकाणी घोडके पती-पत्नी हे दुकानावरती बसले असताना तोंडला रुमाल बांधून तीन इसम दुकानांमध्ये आले आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोने-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास गुन्हे शाखा करत असताना मिळालेल्या माहितीवरून सिन्नर फाटा परिसरात या प्रकरणातील संशयित आरोपी निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार (रा. नंदन आपारमेंट, दत्तनगर चुंचाळे) हा काळा रंगाच्या बुलेट गाडीवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देवुन गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस कर्मचारी महेश साळुंके, विशाल काठे, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलिदसिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे सिन्नरफाटा येथे सापळा रचला होता. ज्यावेळी बेलदार हा या ठिकाणी आला, त्यावेळी त्याला या ठिकाणी रंगेहात अटक करण्यात आली. त्याच्याकडून बुलेट सह त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 44.580 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले असून त्याची किंमत पाच लाख 40 हजार 225 रुपये असून बेलदाराने गुन्हा केल्याचे मान्य केले आहे. तर त्याचे अन्य दोन साथीदार हे फरार असून त्याच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे दोन पथक हे रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा संशयीत आरोपीचा शोध घेत आहे.
—-
दोन संशयित आरोपी पकडण्यासाठी आता तीन विशेष पथक तैनात
सशस्त्र दरोड्यातील तिघा संशयितांपैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असले तरी अजूनही दोघे संशयित फरार आहेत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याचे व मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांचे तीन पथक तैनात करण्यात आले असून, लवकरच दोघांना ताब्यात घेतले जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
नाशिक : बांधकाम परवानगी देण्यासाठी मागितलेल्या लाचेचा मोबदला स्वीकारताना त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. अटक…