मनपा कडून अतिक्रमण मोहीम सुरूच!
नाशिक शहरात सध्या अतिक्रमण मोहीम जोरदार सुरू असून नवीन नाशिक, गोविंद नगर, पवन नगर, इंदिरा नगर, पाथर्डी फाटा याठिकाणी मोठी कारवाई करण्यात आली होती यानंतर महानगरपालिका अतिक्रमण विभागाने उपेंद्र नगर, माणिक नगर डीजेपी नगर, माऊली लॉन्स परिसर याठिकाणी विभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार संयुक्त अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. या कारवाई दरम्यान पश्चिम विभाग व सातपूर विभाग या वाहनांचा समावेश होता. सुमारे तीन ट्रक साहित्य व तीन ते चार हाथगाडे जमा करण्यात आले. कारवाई दरम्यान नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे व सत्यम शिंदे राजेंद्र उगले, युवराज जाधव, मिलिंद ढोले, वाहन चालक सुनील हिरे व सातपूर विभाग प्रमुख भगवान सूर्यवंशी, सुमेश दिवे व पश्चिम विभागातील सुनील कदम, मोहन भांगरे आदी कर्मचारी उपस्थित होते.
या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
