नाशिक: श्री काळाराम मंदिरात आज राम जन्मोत्सव !
नाशिक प्रतिनिधी /: रामनवमीचा उत्सव रविवारी भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त शहर मध्ये राममय वातावरण झाले आहे.
श्री काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, अहिल्याराम मंदिर, श्री गोराराम मंदिर, मंदिरासह सातपूर, सिडको आणि इंदिरानगर परिसरातील विविध मंदिरांत तयारी करण्यात आली आहे.
विविध राम मंदिरांत फुलांची सजावट करण्यात आली असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री काळाराम मंदिरात दुपारी १२ वाजता जन्मोत्सव सोहळा होईल.