सार्थ निवड बद्दल समाजातील विविध राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव
नाशिक प्रतिनिधी:/ महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे जोमाने वाहात असतांना पक्षातील निष्टावान व प्रामाणिक कार्यकर्ते हे संघटित राहावे यासाठी प्रत्येक पक्षात संघटनात्मक बदल केले जात असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते डॉ. प्रदिप पवार यांच्या मार्दर्शनाखाली नवीन नाशिक मधील मनसेचे एकनिष्ठ पदाधिकारी संदिप दोंदे यांना पदउन्नती देण्यात आली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक पश्चिम विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचे पत्र दिनकर आण्णा पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सलिम शेख, प्रदेश उपाध्यक्ष अँड.रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे , महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप दोंदे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक पश्चिम विधानसभा (सिडको सातपूर) पक्ष निरीक्षक म्हणून सार्थ निवड करण्यात आली.
त्याप्रसंगी शहर उपाध्यक्ष अर्जुन वेताळ, कैलास मोरे, ज्ञानेश्वर बगडे, सचिन रोजेकर, विशाल भावले, देवचंद केदारे, सातपूर विभाग अध्यक्ष सचिन सिन्हा, नितीन माळी, राजु परदेशी, मिलिंद कांबळे, संदिप मालोकर, मनिष परदेशी, आकाश भागवत, शंकर कनकुसे, विश्वास रुपवते, रोहन भामरे, राहुल आहेर, भुषण सावळे, महिला पदाधिकारी कामिनी दोंदे, अरुणा पाटील, शैला शिरसाट, प्रफुल्ल बनबेरु, बबलु ठाकुर. असंख्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
संदिप दोंदे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक पश्चिम विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून निवड करण्यात आल्याने नवीन नाशिक मधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण असून त्यांच्या या सार्थ निवड बद्दल समाजातील विविध राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.देण्यात येत आहे.