भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित 

भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे समाजभुषण पुरस्काराने सन्मानित 

सत्यमार्ग फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार – २०२५ यावर्षी भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महिलांवरील अन्याय, अत्याचार तसेच महिलांच्या न्याय हक्कासाठी व गरजू महिलानां त्याच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कार्यरत असलेली नाशिक येथील सत्यमार्ग फाउंडेशनचा द्वितीय वर्धापन दिन नाशिक येथील अवधुत स्वामी मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवर व्यक्तींचा सन्मान चिन्ह देत समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजयोगिनी पुष्पा दिदी यांच्या शुभहस्ते सत्कार करत पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजुरकर, संजय देशमुख, अनिल भडांगे, अनिताताई भामरे सत्यमार्ग फाउंडेशनच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई झारेकर, अध्यक्षा मिनाक्षीताई पाटील, उपाध्यक्ष ललीता रामदास ठाकरे, रंगनाथ दरगुडे, दै. सकाळचे उपसंपादक प्रमोदजी दंडगव्हाळ, दै. लोकनामाचे धनंजय बोडके, दै. देशदुतचे निशिकांत पाटील, नाशिक बातमीचे संपादक जगदीश दादा वाघ, सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सत्यमार्ग फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई झारेकर यांनी केले होते.  मिळालेला पुरस्कार हा केवळ माझा एकट्याचे नसून समस्त दिव्यांग बांधवांचा आहे. आपण माझ्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रधान केला त्याबद्दल मी संस्थेच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. या पुरस्कारामुळे सामाजिक कार्याची जबाबदारी वाढली असून यापुठे अजून चांगले कार्य करण्यास नक्कीच प्रोत्सहन मिळत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *