योग्य पद्धतीने टॅक्स प्लॅनिंग करा – सीए संजीव मुथा 

करदात्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा 
नाशिक प्रतिनिधी /: केंद्रीय अर्थसंकल्प घोषित केला जातो तेव्हा केवळ टॅक्स सवलत व टॅक्स स्लॅब इतकाच मर्यादित विचार न करता संपूर्ण भारताच्या विकासासाठी विविध घटकासाठी प्रस्तावित असलेले बजेटचा सविस्तर अभ्यास करणे देखील तितकेच महत्वाचे असल्याचे नाशिक येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट संजीव मुथा यांनी सांगितले.
प्रोफेशनल रियल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) यांच्या वतीने ‘केंद्रिय अर्थसंकल्प २०२५’ याविषयावर नाशिक येथील उंटवाडी रोड वरील इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स हॉल येथे सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सीए संजीव मुथा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्प जवळपास ५४ लाख कोटी रुपयांचा असून देशाचा विकासासाठी त्यात विविध घटकासाठी निधीचे वाटप व नियोजन केले जात असते.
‘अर्थसंकल्प २०२५’ मध्ये इन्फ्रस्ट्रक्चर व अर्बन विकासाकरिता महाराष्ट्राला ५० वर्षासाठी बिनव्याजी १.५ लाख कोटी इतक्या मोठ्या रक्कमेच्या लोन ची तरतूद करण्यात आलेली आहे. याचा फायदा करून घेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या व्यवसाय, उदयॊग धंद्यासाठी या अर्थसंकल्पात विविध व्यवसाय, उद्योग – धंद्यासाठी नवीन कोणत्या तरतुदी, सवलती देऊ केल्यात; त्याचा तुम्हाला कसा उपयोग होऊ शकतो. व्यवसाय, उद्योगाला अधिक चालना मिळून तुमचे उत्पन्न असे वाढेल यासाठी या अर्थसंकल्पाचा सूक्ष्म अभ्यास करून त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. टॅक्स कमी लागावा यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा, करदात्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्पन्न वाढविण्यावर भर द्यावा व प्राणिकपणे टॅक्स भरावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 
संस्थेचे अध्यक्ष विक्रांत आव्हाड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि, संस्थेच्या वतीने नियमितपणे विविध महत्वपूर्ण विषयावर सेमिनारचे आयोजन करण्यात येते यामुळे संस्थेचे सदस्य तसेच इतर लोकांमध्ये अदयावत व महत्वपूर्ण व्यावहारिक ज्ञान प्राप्त होऊन त्याचा व्यवसाय-उद्योगात फायदा व्हावा या उद्देशाने नॉलेज फोरम अंतर्गत २४ व्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव नितीन कोतकर यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजनाकरिता उपाध्यक्ष प्रदीप रणधीर, सहसचिव राज तलरेजा, खजिनदार कैलास कदम, सल्लागार राजेंद्र कोतकर, डी. जे. धामणे तसेच समिती सदस्य नितीन जांगडा, श्रीरंग भदाणे, योगेश नेरकर, संजय दुसे, अमित वाघ, नीलेश येवले, गिरीश विजन, श्रीकांत पाटेकर, यश शाह, क्षितिज दंडगव्हाळ, जगदीश बंग, रवींद्र सूर्यवंशी, पवन राठी, मनीष शाह तसेच प्राण असोसिएशनचे इतर सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *