सीए दिलीप सातभाई यांचे आयकर कायद्यातील दुरुस्ती व विवरणपत्रकाचे सुधारित फॉर्म्स  यावर मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन

सीए दिलीप सातभाई यांचे आयकर कायद्यातील दुरुस्ती व विवरणपत्रकाचे सुधारित फॉर्म्स

यावर मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन

आर्थिक वर्ष संपल्यानंतर प्राप्तिकर/आयकर विवरणपत्रक भरण्यासाठी करदात्यांची लगबग सुरू होते. व्यावसायिक, व्यापारी तसेच पगारदार व्यक्ती याचे प्राप्तिकर/आयकर विवरणपत्रक वेळेत व अचूक भरण्यासाठी कर सल्लागारांना देखील आयकर कायद्याबाबत अद्यावत रहावे लागते.

आयकर कायद्यात सातत्याने होत असलेले बदल, दुरुस्ती व आयकर विवरणपत्रकाचे सीबीडीटीने जारी केलेले सुधारित नवीन फॉर्म अशा महत्त्वपूर्ण व क्लिष्ट बाबीं बाबत कर सल्लागार, सीए, सीएमए, यांना सखोल मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स, अहिल्यानगर टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन आणि नाशिक चॅप्टर ऑफ आयसीएमआय च्या संयुक्त विद्यमानाने प्राप्तिकर/आयकर विवरणपत्रक बाबत बुधवार दि.२८ मे २०२५ रोजी, ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले असून पुणे येथील प्रख्यात सीए आयकर कायदेतज्ञ डॉ दिलीप सातभाई यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यासोबतच पुणे आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री. उमेश जी फडे हे देखील संवाद साधणार आहे. हे ज्ञानपर्व ऑनलाइन माध्यमातून असल्याने सर्वांसाठी खुले असून जास्तीत जास्त प्रॅक्टिशनर्स यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान नॉर्थ महाराष्ट्र, अहिल्यानगर टॅक्स प्रॅक्टिसनर्स असोसिएशन आणि नाशिक चॅप्टर ऑफ आयसीएमआय च्या अध्यक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक महतीसाठी योगेश कातकाडे (जनसंपर्क प्रमुख) मो. ९८८१८-४३६१७ यावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *