नाशिकजिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे आज उद्घाटन — सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित
नाशिक। दि. २७ सप्टेंबर २०२५ — नाशिक शहरातील न्यायप्रणालीला नवी दिशा देणारा महत्त्वाचा टप्पा आज गाठला जात आहे. नाशिक येथील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तसेच वाहनतळ इमारतीच्या भूमिपूजन समारंभाचे आयोजन आज शनिवारी सकाळी ९.३० वाजता पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय, नाशिक येथे करण्यात आले आहे.
या भव्य समारंभाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या शुभहस्ते होणार असून, या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर असतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, सारंग कोतवाल, जितेंद्र जैन आणि अश्विन भोबे हे मान्यवर अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
या ऐतिहासिक सोहळ्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी आणि वकील संघाचे अध्यक्ष नितीन ठाकरे यांनी नागरिक व वकिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या नूतन इमारतीमुळे नाशिक जिल्हा न्यायालयाचे कामकाज अधिक सुलभ, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि नागरिकाभिमुख होणार असल्याचे अपेक्षित आहे.
हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवानाशिक (प्रतिनिधी) नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाने अक्षरशः डोळेझाक केल्याचा आरोप रिपब्लिकन…