नवीन सिडको रस्त्यांना वृक्षांच्या फांद्याचा विळखा
नागरिकांकडून धोकादायक फांद्या, वृक्ष हटवण्याची मागणी
सिडको प्रतिनिधी :/ शहरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक भागात वृक्ष उन्मळून पडले आहेत तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या आहेत. अशा अनेक घटनांमध्ये कोणी जखमी झाले तर काहीचे आर्थिक नुकसान झालेले आहेत. अशातच नवीन सिडको महापालिका विभागीय कार्यालय परिसरातच धोकादायक वृक्ष तसेच रस्त्यांवर फांद्यांचा विळखा दिसून येत आहे. झाडांच्या फांद्या थेट डिव्हाडरवर खाल पर्यंत झुकलेल्या दिसून येत आहे तर काही ठिकाणी वृक्ष रस्त्याच्या बाजूला झुकलेली दिसून येत असल्याने यामुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर वर आला आहे.
दुर्घटना होऊ नये यासाठी वृक्षांची पाहणी करून खबरदारी घेण्यात यावी
पेलिकन पार्क जवळील रस्त्याने मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांची, पालकांची वाहतूक होत असते याठिकाणी काही दिवसापूर्वीच शाळेच्या वेळे दम्यान झाडाची मोठी फांदी पडून पूर्ण रास्ता बंद झाला होता; तत्काळ अग्निशामक दलाला बोलावून रस्ता मोकळा करण्यात आला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसली तरी महापालिकेने शहरातील रस्त्यालगत असलेल्या वृक्षांची पाहणी करून धोकादायक फांद्या, वृक्ष काढून टाकावी याबाबत आम्ही प्रत्यक्ष उद्यानविभागाचे अधिकारी यांची भेट घेत विनंती केली आहे – योगेश भास्कर कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते
