वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने सत्कार

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने सत्कार

सिडको प्रतिनिधी:/ नवीन सिडकोतील अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारी व कायदा सुव्यवस्था मुळे अंबड पोलीस स्टेशन कायमच चर्चेत राहिले आहे. अलीकडच्या काळात सिडकोतील गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. याला वेळीच आळा घालण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अंबड पोलीस स्टेशन मध्ये मधुकर कड यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक मध्ये मधुकर कड यांच्या कामकाजाचा दबदबा असून नाशिककरांना विशेष करून नवीन नाशिक भागातील त्यांना मानणारा मोठा वर्ग असून त्यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गुन्हेगारीला आळा बसून कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांचा सर्वसामान्य व्यक्तीपासून ते अनेक वरिष्ठ मान्यवरांशी सलोखाचे संबंध आहेत. गुन्हेगारी, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कायमच तत्पर व कार्यशील अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक खैरनार साहेब, लोककल्याण कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र जडे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अमोलजी पुरकर, जिल्हाध्यक्ष नारायणराव दुधारे, महानगर सरचिटणीस श्री मंगेश ढिकले, महानगर उपाध्यक्ष धनाजी पुरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *