“नमस्ते नाशिक फाउंडेशन यांची सेवाभावीतून विठ्ठलाची वारी”

“नमस्ते नाशिक फाउंडेशन यांची सेवाभावीतून विठ्ठलाची वारी”

मस्तक आमचे झुकवुनी तुझ्या पाऊली, नाम घेतो तुझे विठू माऊली…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर “विठ्ठलाची वारी करूया साजरी, अशा भक्तिभावाने आणि सेवाभावाने प्रेरित होऊन “जिथे कमी, तिथे आम्ही” या ब्रीदवाक्यानुसार नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाचोरे बुद्रुक, ता. निफाड, जि. नाशिक येथील गरजू विद्यार्थ्यांना पावसाळी साहित्य (रेनकोट, छत्र्या) आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामागील उद्देश म्हणजे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करणं. “मुलांच्या डोळ्यांतील चमक आणि चेहऱ्यावरील हसू – हाच आमचा खरा सन्मान आहे! फक्त साहित्य नाही, तर स्वप्नांनाही पंख देण्याचा आमचा प्रयत्न आहे!” अशा शब्दांत नमस्ते नाशिक फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्नेहल देव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या उदात्त भावनेतूनच विद्यार्थ्यांना रेनकोट, छत्र्या, शालेय दप्तर, पेन यांसह विविध उपयुक्त साहित्य वाटप करण्यात आले. एकूण २७५ विद्यार्थ्यांना नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहल देव, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रि. विंग कमांडर प्रदीप बागमार व प्रसिद्ध कॉस्मेटोलॉजिस्ट डॉक्टर पल्लवी बागुल यांच्या हस्ते मुलांना साहित्याचे वाटप करण्यात आले,
कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. कार्यक्रमाप्रसंगी अशोक सावकार, मेघा बागुल, नम्रता सावकार, अरुण निकम- मुख्याध्यापक, सुनील आंधळे, नम्रता ब्राह्मणकर, आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी थोरात मॅडम, जाधव सर, चोथे मॅडम, आदि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीयुत रसाळ सर यांनी मनोगत व्यक्त करताना नमस्ते नाशिक फाउंडेशन या संस्थेचे आभार मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी नमस्ते नाशिक फाउंडेशनचे संदीप देव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रवी साळुंके सर यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *