त्र्यंबक नगरपरिषदेचे दोन कर्मचारी ACBच्या जाळ्यात

हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

नाशिक : बांधकाम परवानगी देण्यासाठी मागितलेल्या लाचेचा मोबदला स्वीकारताना त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेतील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रचना सहाय्यक मयूर श्याम चौधरी (वर्ग २) आणि सफाई कामगार अमोल विलास दोंदे यांचा समावेश आहे.

तक्रारदार व त्यांच्या आईच्या नावावर त्र्यंबक परिसरात असलेल्या भूखंडावर नवीन घर बांधकाम सुरू करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन प्रस्ताव नगरपरिषदेकडे सादर केला होता. आवश्यक शुल्क भरूनही परवानगी न मिळाल्याने तक्रारदाराने चौकशी केली असता, रचना सहाय्यकाने मोबाईलवर २५ हजार रुपये लाच मागितल्याचे समोर आले. तसेच, ती रक्कम सफाई कामगार दोंदेकडे देण्यास सांगितले होते.

याबाबत तक्रारदाराने ACBकडे तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान दोन्ही कर्मचारी तडजोडीअंती १० हजारांची लाच स्वीकारताना बुधवारी (दि. २६) उशिरा रात्री त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डीसुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक स्वाती पवार, परशुराम जाधव आणि त्यांच्या पथकाने केली.


हि बातमी पुढील ग्रुपवर पाठवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *