“कॉर्पोरेट जिहाद” आरोपींवर मकोका लावा…धर्मवीर अध्यात्मिक सेनेची मागणी

“कॉर्पोरेट जिहाद” आरोपींवर मकोका लावा…धर्मवीर अध्यात्मिक सेनेची मागणी

नाशिक (दि. १० एप्रिल २०२६) – शहरातील बहुचर्चित “कॉर्पोरेट जिहाद” प्रकरणात कठोर कारवाईची मागणी पुढे आली असून संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) लागू करण्यासाठी पोलिस आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले आहे.

मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. आरोपींनी केलेली कृत्ये अत्यंत गंभीर व अमानुष स्वरूपाची असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पीडितांची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून त्याबाबत अधिक माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.

निवेदनानुसार, हा गुन्हा पूर्वनियोजित पद्धतीने आणि संघटित स्वरूपात करण्यात आला असून यामागे बाह्य घटकांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच मुख्य सूत्रधार पडद्यामागून आरोपींना आर्थिक व इतर प्रकारची मदत पुरवत असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.

या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारांचा समावेश असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आरोपींवर केवळ सामान्य गुन्ह्यांखाली कारवाई न करता मकोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *