प्रशासकांना निवेदन सादर करणार
नाशिक प्रतिनिधी :/ नाशिक जिल्हा बँकेच्या जूलमाविरूध्द, सावकारी कर्ज वसुली विरोधात व जिल्हा बँकेच्याने शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर बँकेचे नावे हुकूमशाही पद्धतीने लावण्याची जुलमी मोहीम सुरू केलेली आहे. त्या विरोधात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र होऊन एकजुटीने जिल्हा बँकेच्या आवारात सोमवार, दि. २४ जून २०२४ रोजी सकाळी १२.०० वा. निवेदन देण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन “६६,००० कर्जबाजारी शेतकरी (शेतकरी बचाओ कृती समिती)” करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. “एक दिवस शेतीकाम बंद करा पण हजर राहा”. जातपात सोडा, पक्ष, पॅनल सोडा, शेतकरी वाचवण्यासाठी एक दिवस एकत्र या अशी “नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात आली आहे”
मोठ्या प्रमाणावर विविध संघटना सहभागी होणार
नाशिक जिल्हा बँकेच्या शेतकरी विरोधात अन्यायकारक अशी सावकारी कर्ज वसुली विरोधात समस्त शेतकरी बांधव प्रतिनिधी, शेतकरी हितचिंतक, शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते, सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते याच बरोबर मा. आमदार रामदास चारोस्कर, गंगाधर खंडेराव निखाडे (सरपंच, ओझरखेड) प्रशांत आप्पा कड पाटील (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,दिंडोरी), संदीप भाऊ जगताप, (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना), राजु देसले (किसान सभा, महाराष्ट्र राज्य, सचिव), भगवान बोराडे (शेतकरी एकजूट समिती), भास्करराव शिंदे (किसान सभा, नाशिक जिल्हा), नाना बच्छाव (शेतकरी राष्ट्र समिती), करण गायकर (संस्थापक अध्यक्ष, छावा क्रांतीवीर सेना), जितेंद्र भावे,(अध्यक्ष, भारत निर्भय पार्टी), शंकर दरेकर (किसान क्रांती मोर्चा,महाराष्ट्र) इ. सहभागी होणार आहेत.