श्री रेणुका देवीच्या जयघोषात नवीन नाशिक दुमदुमले; 9 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला

नवीन नाशिक येथील शुभम पार्क कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने श्री रेणुका देवी ( माहूरगड ) मंदिराचा 9 वा वर्धापन दिन सोहळ्या मोठ्या उत्साहात पार पडला.श्री रेणुका देवी मंदिराच्या 9 व्या वर्धापन दिन सोहळ्यास शुक्रवार दिनांक 8 मे 2026 पासून प्रारंभाला झाला. हा तीन दिवसीय धार्मिक सोहळा रविवार दिनांक 10 मे पर्यंत मोठ्या भक्ती भावात पार पडला असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.शुभम पार्क कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या आयोजनखाली आणि रेणुका माता महिला मंडळाच्या सहकार्याने हा वर्धापन दिन सोहळा वैशाख कृष्ण या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात 8 मे रोजी देवीचे पूजन व सप्तशती पाठाने सुरुवात करण्यात आली. 9 मे रोजी कुमकुम अर्चन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी महिला भजनी मंडळाचा भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दहा मे रोजी होम हवन व श्री रेणुका देवी मातेला 56 भोगचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी श्री रेणुका देवीच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकी मध्ये लेझीम पथक, शंख वादन तसेच सप्तशृंगी सह कालिका देवी व गोंधळी यांची वेशभूषा केलेल्या महिला भक्तगण या केंद्रबिंदू ठरल्या.तसेच सायंकाळी महाआरती त्यानंतर बक्षीस समारंभ व लकी ड्रॉ तसेच करा ओके क्लबच्या वतीने संगीत कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते.यासोबतच भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली होती.यावेळी शुभम पार्क कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने या तीन दिवसीय धार्मिक उत्सवाला सर्व भाविकांनी उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे व कार्यक्रमाला लाभ द्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *