श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अहिल्यारत्न पुरस्काराचे आयोजन
नाशिक: पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त नाशिक येथील सेवाभावी संस्था श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रविवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सातपूर आयटीआय सिग्नल येथील नाईस हॉलमध्ये ‘महाराष्ट्र अहिल्या रत्न पुरस्कार सन्मान सोहळा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन महाराष्ट्रातील सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ – श्रेष्ठ मान्यवर व्यक्तीचा अहिल्यारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष सौ शिल्पा झारेकर यांनी दिली आहे.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्ष सौ अरुणा रंगनाथ दरगुडे यांनी केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पू ब्रह्मकुमारी पुष्पा दीदी या उपस्थित असणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तेजश्री आंबेकर (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सातपूर) उपस्थित असणार आहे.
या कार्यक्रमास नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, विश्वास आप्पा नागरे व समाधान भाऊ देवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून कार्यक्रमास मा रघुनाथ पर्वत कुवर नायब तहसीलदार, सुनील कोडगी महाराष्ट्र हास्य योगा अध्यक्ष ,राजेंद्र भालचंद्र सोनवणे नाशिक मनपा शाखा अभियंता दिलीप पंढरीनाथ शेळके पोलीस निरीक्षक आयुक्त नाशिक, संजय विजय देशमुख साईधनवर्ष फाउंडेशन अध्यक्ष, शंकर सुनील मिटकरी माधव गोशाळा संचालक, गुड्डू भाई सय्यद मानव अधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष, आशा पाटील ग्राहक संरक्षण समिती अध्यक्ष, राधिका काळे गंगापूर पोलीस स्टेशन समुपदेशक वैशाली गोरे गंगापूर पोलीस स्टेशन समुपदेशक इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार असून यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन
संस्थेच्या वतीने सौ. शिल्पा झारेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: ७७७५८९३१८६ / ७३८५८६४६४१.