नाशिक शहर | Crime| चोरट्यांनी फ्रिजमध्ये लपविलेले सोन्याचे दागिने केले लंपास
नाशिक प्रतिनिधी /: देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या बंगल्यात घुसून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना पखालरोड भागात घडली. याप्रकरणी १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल चोरल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवला आहे.
वडाळागावातील रहिवाशी नरेंद्र वनवे यांनी मुंबई नाका पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांची बहिणी अनिता देविदास पिंगळे यांच्या राहत्या बंगल्यात ही घरफोडी झाली. अनिता व देविदास हे दोघे ३ जून रोजी रात्री साडेबारा वाजता देवदर्शनासाठी रवाना झाले. त्यानंतर ५ जून रोजी मध्यरात्री एक वाजता त्यांचे जावई आशुतोष लेंडे हे पुणे येथून नाशिकमध्ये पोहोचले.
दरम्यान, त्यावेळी घरात चोरी झालाचा संशय आल्याने त्यांनी वनवे यांना कळविले. वनवे यांनी बंगल्याची पाहणी केल्यावर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निसार शेख पुढील तपास करीत आहेत.