नाशिक प्रतिनिधी /: नाशिक मधील गणेशगाव आणि त्र्यंबकेश्वर जवळील पेगलवाडी येथील दोन गटात महिरावणी शिवारात जबर हाणामारी झाली. या हाणामारीत धारदार हत्यारांचा वापर करण्यात आल्याने एक युवक जागीच ठार झाला. अंकुश गोहिरे वय वर्ष १८ असे मयत युवकाचे नाव आहे. हाणामारी झाल्यानंतर जखमींना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मागील भांडणाची कुरापत काढून एकमेकांना महिरावणी शिवारात बोलवून घेतले. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरच्या महिरावणी शिवारात त्यांच्यात हाणामारी झाली. घटनास्थळावर पोलिसांना तीक्ष्ण हत्यारे आढळून आली आहेत. दोन्ही गटांचे मिळून दहा ते बारा युवक असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी युवक वगळता अन्य सर्व फरार झाले. मात्र पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
जाहिरात