नाशिक | कामटवाडे | मद्यधुंद कारचालकाची रो-हाऊसला धडक; कारचालक जखमी
जॉईन व्हाट्सअप ग्रुप
प्रतिनिधी :/ कामटवाडा, डीजीपीनगर नं. २ येथे रात्रीच्या वेळेस दारूच्या नशेत कारचालकाने रोहाउसला घडक दिल्याने झालेल्या अपघातात रो- हाऊसचे संरक्षण भिंत आणि पत्र्याच्या शेडचे नुकसान झाले. या धडकेत कारचालक जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक तळेल रा. कामटवाडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री घरात झोपलो असताना बाहेर मोठा आवाज आला. बाहेर येऊन पाहिले असता गाडी क्रमांक एमएच ०१ बीएफ ३१९८ या क्रमांकाच्या कारने रो हाऊसच्या संरक्षण भिंतीला धडक दिल्याने भिंत आणि बाहेरील पत्र्याचे शेड कोसळल्याचे दिसले. संशयित कारचालक गणेश फोकणे याच्याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.