Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170

Warning: Cannot modify header information - headers already sent by (output started at /home/wagh/public_html/index.php:1) in /home/wagh/public_html/wp-includes/feed-rss2.php on line 8
सटाणा – नाशिक बातमी https://nashikbatmi.com आपलं शहर...आपली बातमी Fri, 05 Jul 2024 12:36:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://nashikbatmi.com/wp-content/uploads/2024/10/cropped-nashik-batmi-logo-32x32.jpeg सटाणा – नाशिक बातमी https://nashikbatmi.com 32 32 बागलाण अकॅडमीत वृक्षारोपण. https://nashikbatmi.com/?p=1322 https://nashikbatmi.com/?p=1322#respond Fri, 05 Jul 2024 12:36:08 +0000 https://nashikbatmi.com/?p=1322 सटाणा :-येथील पोलीस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बागलाण अकॅडमीत 101 वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी gप्राणी आणि निसर्ग मित्र समाजसेवक…

The post बागलाण अकॅडमीत वृक्षारोपण. first appeared on नाशिक बातमी.

सटाणा :-येथील पोलीस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बागलाण अकॅडमीत 101 वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी gप्राणी आणि निसर्ग मित्र समाजसेवक राकेश घोडे हे म्हणाले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे ह्या म्हणीनुसार झाडे लावा झाडे जगवा .झाडे आम्हाला ऑक्सिजन देतात शिवाय सावली सुद्धा देतात झाडांशिवाय आपण काही वेळ सुद्धा जास्त जगू शकत नाही वृक्ष आपल्याला रखरखत्या उन्हापासून सावली सुद्धा देतात. पशुपक्षी या झाडांचा सहारा घेऊन आपले जीवन सुरक्षित जगतात.माणसाचे झाडांशी फार महत्त्वाचे नाते जमले आहे. त्यांची सुरक्षा व पालन पोषण करणे हे मानव जातीचे महत्त्वाचे काम आहे मानवाने निसर्गावर जर प्रेम केले तरच पर्यावरण चांगले राहील .नाहीतर काही कालांतराने मानव सोबत पशुपक्ष्यांचे सुद्धा नुकसान होईल. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदा महाले मा.प.सं सदस्य विरेश घोडे. सुनिल पाटील. देवेंद्र पवार. दिलिप खैरणार, अरुण देवरे ,गुलाबराव जैन, माजी सैनिक निलेश अहिरे, हंसराज अहिरे सुमित शेवाळे डीडीयु जीकेवायचे देवीसिंग राजपूत राहुल महाले देवरे सर भास्कर अहिरे आदी उपस्थित होते.

The post बागलाण अकॅडमीत वृक्षारोपण. first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1322 0
ताहराबाद येथील पुलाचे काम संथ गतीने, नागरीकांमध्ये तीव्र नाराजी, आमदार दिलीप बोरसे यांनी ठेकेदार व अधिकारी वर्गाला धरले धारेवर https://nashikbatmi.com/?p=1303 https://nashikbatmi.com/?p=1303#respond Mon, 01 Jul 2024 04:16:16 +0000 https://nashikbatmi.com/?p=1303 दिलीप बोरसे यांनी ठेकेदार व अधिकारी वर्गाला धरले धारेवर,दहा दिवसांत काम पुर्ण करण्याच्या दिल्या सुचना प्रतिनिधी सटाणा /: तालुक्यातून जाणाऱ्या…

The post ताहराबाद येथील पुलाचे काम संथ गतीने, नागरीकांमध्ये तीव्र नाराजी, आमदार दिलीप बोरसे यांनी ठेकेदार व अधिकारी वर्गाला धरले धारेवर first appeared on नाशिक बातमी.

दिलीप बोरसे यांनी ठेकेदार व अधिकारी वर्गाला धरले धारेवर,दहा दिवसांत काम पुर्ण करण्याच्या दिल्या सुचना

प्रतिनिधी सटाणा /: तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ताहाराबाद येथील मोसम नदीवरील पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असताना आमदार दिलीप बोरसे यांनी रविवारी(दि.३०) सकाळच्या सुमारास अचानक कामाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार बोरसे यांनी रुद्रावतार धारण करीत ठेकेदार व अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली असून येत्या दहा दिवसात काम पूर्ण झाल्यास पुढील परिणामास सामोरे जावे लागेल,असा गर्भित इशाराही दिला आहे.साहजिकच एरवी शांत व संयमी मानल्या जाणाऱ्या आमदार बोरसे यांचा हा रुद्रावतार पाहून अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला असून परिसरातील जनतेने मात्र याबाबत समाधान व्यक्त करीत हे काम तातडीने मार्गी लागावे,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या पार्श्वभूमीवर ताहाराबाद येथील मोसम नदीवरील जीर्ण झालेल्या पुलाच्या ठिकाणी पर्यायी पुलाचे काम सुरू आहे.गेल्या दीड महिन्यापासून यामुळे पूर्वीच्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.परंतु त्यामुळे मात्र अवजड वाहतूक,एसटी बसेस व अन्य वाहनधारकांची प्रचंड कुचंबणा होत असून त्यांच्याकडून पर्यायी मार्गाचा वापर केला जात आहे.त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील ताहाराबाद अंतापुर मांगीतुंगी फाटा,ताहाराबाद सोमपूर भडाणे पिंपळकोठे मांगीतुंगी फाटा व ताहाराबाद सोमपूर दरेगाव मांगीतुंगी फाटा या प्रमुख तीन ग्रामीण मार्गांचा वापर केला जात असून अल्पावधीतच त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.अवजड वाहतुकीमुळे या ग्रामीण मार्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त होत आहे.दुसरीकडे या मार्गावरून परिसरातील विद्यार्थ्यांची होणारी ने आणही बंद झाल्यामुळे पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे याबाबत जनतेमधून जोरदार मागणी होत आहे.धिम्या गतीने सुरू असलेल्या कामाबाबत तीव्र असंतोष व्यक्त होत असून या पार्श्वभूमीवर जनतेच्या भावनांची दखल घेत आमदार दिलीप बोरसे यांनी रविवारी(दि.३०) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक या कामाच्या ठिकाणी भेट दिली.कामाबाबत माहिती घेतानाच प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकारी व ठेकेदारास पाचारण केले.यावेळी आमदार बोरसे यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.इतर ठिकाणी अशा स्वरूपाची कामे दहा दिवसात पूर्ण होत असताना या ठिकाणी दीड महिना उलटूनही काम होत नसल्याने तुम्ही झोपा काढतात का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत येत्या दहा दिवसात काम पूर्ण न झाल्यास होणाऱ्या परिणामास तोंड द्यावे लागेल असा गर्भित इशाराही आमदार बोरसे यांनी दिला. साहजिकच आमदार बोरसे यांचा हा रुद्रावतार बघून अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले.आमदार बोरसे यांनी आक्रमक पावित्रा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावल्याने याबाबत जनतेमधून मात्र समाधान व्यक्त होत असून पुलाचे काम तातडीने पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आता निर्माण झाली आहे.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय भामरे,शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख सुभाष नंदन,नामपुर बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भामरे, नामपुर बाजार समिती संचालक पंकज भामरे,भडाणे सरपंच अरुण भामरे, आखतवाडे सरपंच अशोक खैरनार, ताहाराबाद उपसरपंच जीवन माळी,डॉ.उदय निकम,निखिल कासारे,सचिन कोठावदे,सुरेश महाजन,योगेश नंदन,मुकेश साळवे,गोविंद खैरनार,रवी मानकर,राजेश माळी,नितीन घरटे आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

The post ताहराबाद येथील पुलाचे काम संथ गतीने, नागरीकांमध्ये तीव्र नाराजी, आमदार दिलीप बोरसे यांनी ठेकेदार व अधिकारी वर्गाला धरले धारेवर first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1303 0
सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण १२ जुलै पर्यत निघणार; https://nashikbatmi.com/?p=1278 https://nashikbatmi.com/?p=1278#respond Fri, 28 Jun 2024 11:15:47 +0000 https://nashikbatmi.com/?p=1278 सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण १२ जुलै पर्यत निघणार; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साई सावली फाउंडेशनच्या सदस्यांना लेखी आश्वासन सटाणा:/  शहरातून…

The post सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण १२ जुलै पर्यत निघणार; first appeared on नाशिक बातमी.

सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण १२ जुलै पर्यत निघणार;

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साई सावली फाउंडेशनच्या सदस्यांना लेखी आश्वासन

सटाणा:/  शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी ह्या महामार्गाचे दोध्येश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान रस्ता काँक्रीटीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण न काढताच रस्त्याचे काम सुरू करण्यात आहे. याबाबत साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे व इतर सदस्यांनी अतिक्रमण न काढता काम केल्यास आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला होता. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी सतिष आहेर, नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार व साई सावली फाउंडेशनचे पदाधिकारी यांची सयुक्त बैठक सटाणा पोलीस स्टेशन येथे घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने दि.२९ पासुन रस्त्याच्या दोन्ही बाजुचे अतिक्रमण रेषा निश्चित करुन अतिक्रमण धारकांना नोटीसा देऊन १२ जुलैनंतर अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येईल त्यानंतरच पुढील रस्ता काम सुरु होईल याबाबतचे लेखी पत्र आत्मदहन करणाऱ्या साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे, भुषण निकम, चेतन सुर्यवंशी, पंकज सोनवणे, प्रफुल्ल कुवर, संदिप सोनवणे, शुभम शेवाळे, सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनवणे, सुरज सोनवणे व पदाधिकाऱ्यांना दिल्याने १२ जुलै पर्यंत आंदोलन स्थगित करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.

@@कारवाई न केल्यास १३ जुलैला आत्मदहन@@

प्रशासनाने १२ जुलै पर्यंत अतिक्रमण काढण्याबाबत लेखी दिलेले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेत दि. २९ जूनचे नियोजित आत्मदहन स्थगित करण्यात येत आहे. मात्र १२ जुलै नंतर प्रशासनाने कारवाई न केल्यास १३ जुलैला आत्मदहन आंदोलन करण्यात येईल – प्रशांत कोठावदे, अध्यक्ष साई सावली फाउंडेशन

The post सटाणा शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण १२ जुलै पर्यत निघणार; first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1278 0
जनता विद्यालय मुल्हेर च्या शिक्षकांच्या प्रयत्नामुळे माळीवाडे गावातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाली बस सेवा https://nashikbatmi.com/?p=1266 https://nashikbatmi.com/?p=1266#respond Fri, 28 Jun 2024 02:02:24 +0000 https://nashikbatmi.com/?p=1266 सटाणा | प्रतिनिधी :/  बागलाण तालुक्यातील माळीवाडे या गावातून जनता विद्यालय मुल्हेर येथे पाचवी ते बारावी साठी दोनशे विद्यार्थी येतात.…

The post जनता विद्यालय मुल्हेर च्या शिक्षकांच्या प्रयत्नामुळे माळीवाडे गावातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाली बस सेवा first appeared on नाशिक बातमी.

सटाणा | प्रतिनिधी :/  बागलाण तालुक्यातील माळीवाडे या गावातून जनता विद्यालय मुल्हेर येथे पाचवी ते बारावी साठी दोनशे विद्यार्थी येतात. हे सर्व विद्यार्थी आदिवासी व गरीब कुटुंबातील असून यांना खाजगी बसने येणे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी रोज पाच किलोमीटर पायी प्रवास करून शाळेत येतात. पावसाळ्यात पावसामुळे तसेच सायंकाळी जाताना अंधार होतो आजूबाजूला दाट झाडी जंगल असल्याने खूप भीती वाटते, त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून या विद्यार्थ्यांची पायपीट बंद व्हावी यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक नंदन, डांग सेवा मंडळाचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब, पर्यवेक्षक श्री दिलीप जाधव, पर्यवेक्षक श्री मधुकर मोरे, विद्यालयाचे पास विभागाचे प्रमुख श्री निलेश जाधव, श्री चंद्रकांत येवला, श्री सचिन पगार, श्री राजेंद्र भोये, श्री महेंद्र सूर्यवंशी, श्री सचिन जाधव आदी शिक्षकांनी परिसरातील पालक, सरपंच व पदाधिकारी यांची भेट घेऊन एसटी महामंडळाची बस सुरू करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच सटाणा आगारात जाऊन आगार व्यवस्थापक स्थानक प्रमुख व वाहतूक नियंत्रक यांच्याशी वारंवार चर्चा केली. त्यांना विनंती अर्ज देऊन विद्यार्थ्यांची पायपीट थांबवण्यासाठी विनंती केली. अखेर आजपासून या माळीवाडे गावातील विद्यार्थ्यांसाठी सटाणा आगाराच्यावतीने स्वतंत्र बस सेवा सुरू करण्यात आली. यावेळी या बसचे वाजत गाजत माळीवाडे येथील ग्रामस्थांनी स्वागत केले. याप्रसंगी माळीवाड्याचे सरपंच श्री काशिनाथ गवळी उपसरपंच भाऊराव माळी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच मोहोळागी च्या सरपंच सौ संगीता साबळे, जैतापूरचे सरपंच श्री तात्याभाऊ चौरे, सोमनाथ साबळे (सेवानिवृत्त पी.एस.आय.)आदी उपस्थित होते. या सर्वांनी आगार व्यवस्थापक श्री राजेंद्र अहिरे, स्थानक प्रमुख ते एस.आर. कांबळे, वाहतूक नियंत्रक पी. इ. सूर्यवंशी, चालक पी. एस. भामरे, वाहक श्रीमती आर. आर. जाधव, कर्मचारी जालिंदर बोरसे, विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षकांचे स्वागत केले व एसटीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस गावात आल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

The post जनता विद्यालय मुल्हेर च्या शिक्षकांच्या प्रयत्नामुळे माळीवाडे गावातील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाली बस सेवा first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1266 0
शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढा अन्यथा आत्मदहन; साई सावली फाउंडेशनचा प्रशासनाला इशारा  https://nashikbatmi.com/?p=1262 https://nashikbatmi.com/?p=1262#respond Fri, 28 Jun 2024 01:51:26 +0000 https://nashikbatmi.com/?p=1262 सटाणा | प्रतिनिधी :/ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी च्या दोध्येश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान अतिक्रमण न काढता…

The post शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढा अन्यथा आत्मदहन; साई सावली फाउंडेशनचा प्रशासनाला इशारा  first appeared on नाशिक बातमी.

सटाणा | प्रतिनिधी :/ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी च्या दोध्येश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान अतिक्रमण न काढता नूतनीकरणाचे काम केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे व इतर सहकाऱ्यांनी तहसीलदार बागलाण यांना दिला आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, व्यापारी प्रतिष्ठाने व गुजरात राज्याला जोडणार जवळचा मार्ग असल्याने नेहमीच लोकांची व अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे अनेक अपघात होतात व अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. शहरवासीयांना अपेक्षा होती की रस्त्याचे नूतनीकरण होण्यापूर्वी अतिक्रमण काढले जाईल, परंतु तसे न होता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या, पण त्यावर कोणतीही कारवाई न करता रुंदीकरणाचे काम सुरू झाले. यामुळे ठेकेदार व प्रशासनावर दबाव आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने २९ तारखेपर्यंत अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा साई सावली फाउंडेशनच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा प्रफुल्ल कुवर, चेतन सूर्यवंशी, विजय सोनवणे, भुषण निकम यांनी दिला आहे.

प्रतीक्रिया @@

अतिक्रमण काढणेसाठी शहरातील समाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा उपोषण केले आहे निवेदन दिले आहेत परंतु कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे आम्ही आता आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन जीवांना इजा पोहोचल्यानंतर तरी शहर वासियांना मोकळा श्वास घेता येईल व इथून पुढे अरुंद रस्त्यामुळे जे अपघातात व त्यामुळे जर कोणाचा जीव जातं असेल तर तो नक्की वाचेल: प्रशांत कोठावदे अध्यक्ष: साई सावली फाउंडेशन

The post शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढा अन्यथा आत्मदहन; साई सावली फाउंडेशनचा प्रशासनाला इशारा  first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1262 0
लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान खात्यावर वर्ग करा – https://nashikbatmi.com/?p=1256 https://nashikbatmi.com/?p=1256#respond Thu, 27 Jun 2024 03:27:31 +0000 https://nashikbatmi.com/?p=1256 लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान खात्यावर वर्ग करा माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन…

The post लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान खात्यावर वर्ग करा – first appeared on नाशिक बातमी.

लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान खात्यावर वर्ग करा
माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

सटाणा प्रतिनिधी :/ – पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या पोर्टलवरील लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणीमुळे सटाणा शहरातील अनेक शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून आणि १२ व्या हप्त्यापासून केंद्र शासनाच्या पीएम किसान व राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेपासून वंचित आहेत. लॅन्ड सिडींगची तांत्रिक अडचण दूर करून वंचित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर योजनांचा हप्ता वर्ग करावा, या मागणीसाठी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान, यासंदर्भात आपण तत्काळ अहवाल मागवून घेणार असून लवकरच राज्याच्या कृषी आयुक्तांना प्रस्ताव सादर करून याप्रश्नी तोडगा काढणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी शिष्टमंडळाला दिले.
जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात झालेल्या चर्चेत बोलताना माजी आमदार श्री.चव्हाण म्हणाले, शहरातील तब्बल २५० शेतकरी बांधव सप्टेंबर २०२२ पासून आणि १२ व्या हप्त्यापासून केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान (पी.एम. किसान) व राज्य शासनाच्या नमो शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असल्याने त्यांना या दोन्ही योजनांचे हप्ते मिळत नाहीत. या संदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र लँड सिडींग कारणामुळे या दोन्ही योजनांचा लाभ देता येत नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा आजपर्यंत संबंधित शेतकऱ्यांना पी.एम. किसान व नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत अद्याप हप्ते मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र व राज्य शासनाबद्दल असंतोष वाढत आहे. याचा गांभीर्याने विचार करून लॅन्ड सिडींगची तांत्रिक अडचण दूर करावी आणि शेतकऱ्यांना योजनांचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा, अशी मागणीही श्री.चव्हाण यांनी जिल्हाधिकारी श्री.शर्मा यांच्याकडे केली. दरम्यान, याबाबत विभागीय आयुक्त प्रवीम गेडाम यांनाही निवेदन देण्यात आले आहे. शिष्टमंडळात राजेंद्र सोनवणे, मोरेनगरचे सरपंच बाळासाहेब देवरे, नंदकिशोर सोनवणे, राजेंद्र पाटील, आशिष सोनवणे, विलास सोनवणे, जयवंत सोनवणे, ललित सोनवणे, संजय सोनवणे, शांताराम सोनवणे, दिलीप सोनवणे, दगडू सोनवणे आदि शेतकरी सहभागी होते.

चौकट :
…तर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा!
वारंवार तक्रारी करूनही लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत शासनस्तरावरून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. तालुकास्तरावरून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर संबंधित शेतकर्‍यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली आहे. आता यानंतरही दोन्ही योजनांचा लाभ मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया :
1. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही सर्व शेतकरी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र अधिकारी व कर्मचारी आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. जिल्हाधिकार्‍यांच्या आश्वासनानंतरही लँड सिडिंगची समस्या मार्गी लागून आम्हाला न्याय मिळाला नाही, तर नाइलाजाने आम्हा शेतकर्‍यांना आंदोलन करावे लागेल.
– राजेंद्र सोनवणे, शेतकरी

2. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उदात्त हेतूने केंद्र व राज्य सरकारने पी.एम. किसान व नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केल्या असून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, परंतु लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी व इतर कारणांमुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून अद्याप वंचित आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
– संजय चव्हाण, माजी आमदार

The post लॅन्ड सिडींगच्या तांत्रिक अडचणी दूर करून अनुदान खात्यावर वर्ग करा – first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1256 0
महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत जोमाने कामाला लागा: शरद पवार https://nashikbatmi.com/?p=1162 https://nashikbatmi.com/?p=1162#respond Mon, 17 Jun 2024 02:15:41 +0000 https://nashikbatmi.com/?p=1162 महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत जोमाने कामाला लागा: शरद पवार बातम्यांसाठी जॉईन व्हाट्सअप ग्रुप सटाणा प्रतिनिधी /: लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा…

The post महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत जोमाने कामाला लागा: शरद पवार first appeared on नाशिक बातमी.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत जोमाने कामाला लागा: शरद पवार

बातम्यांसाठी जॉईन व्हाट्सअप ग्रुप

सटाणा प्रतिनिधी /: लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी महत्त्वाचे योगदान दिले. देशात सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठबळावर भाजपचे अस्थिर सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता खेचून आणणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट्य असून येत्या तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलाण तालुक्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शरद पवार

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करताना माजी आमदार दीपिका चव्हाण, संजय चव्हाण, यशवंत अहिरे, केशव मांडवडे, विजय वाघ, साहेबराव सोनवणे, मनोज सोनवणे, डॉ.विठ्ठल येवलकर आदि तर शरद पवार यांची भेट घेताना नवनिर्वाचित खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, माजी मंत्री हेमंत देशमुख, शिरीष कोतवाल, शाम सनेर आदी.

यांची भेट घेतली. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, देशात आणि राज्यातील जनतेमध्ये भाजप विरोधी लाट असल्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसला. त्यामुळे भाजपला २४० जागांवर समाधान मानावे लागले, तर राज्यात महाविकास आघाडीला ३१ जागांवर यश मिळाले. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीत अत्यंत प्रामाणिक काम केल्याचे हे फलित आहे. येत्या तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी आपण महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार आहोत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेच्या हिताची प्रश्ने मांडून ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत धनशक्तीच्या जोरामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत बागलाण तालुक्यात भाजपचे मताधिक्य कमी झाले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्यात येत्या विधानसभा निवडणुकीत दीपिका चव्हाण यांना मताधिक्क्य वाढणे गरजेचे आहे. बागलाणसह धुळे व नाशिक जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नवनिर्वाचित खासदार, तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

यावेळी पवार यांनी धुळे व नाशिक लोकसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला व त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार शिरीष कोतवाल, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, प्रांतिक सदस्य यशवंत अहिरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, डॉ.दिनेश बच्छाव, डॉ.विठ्ठल येवलकर, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, शरद आहेर, रायुकाँचे मुन्ना मांडवडे, नितीन सोनवणे, आनंद सोनवणे, बी.टी.भदाणे, दिलीप पाटील, डॉ.मयुरी बच्छाव, प्रज्ज्वल भामरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

The post महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत जोमाने कामाला लागा: शरद पवार first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1162 0
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता सटाणा महाविद्यालायापर्यंत बस सेवा उपलब्ध https://nashikbatmi.com/?p=1145 https://nashikbatmi.com/?p=1145#respond Fri, 14 Jun 2024 15:10:52 +0000 https://nashikbatmi.com/?p=1145 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता सटाणा महाविद्यालायापर्यंत बस सेवा उपलब्ध प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या प्रयत्नांना यश    सटाणा : (प्रति.)…

The post ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता सटाणा महाविद्यालायापर्यंत बस सेवा उपलब्ध first appeared on नाशिक बातमी.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता सटाणा महाविद्यालायापर्यंत बस सेवा उपलब्ध

प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या प्रयत्नांना यश

सटाणा : (प्रति.) येथील म.वि.प्र. समाज नाशिक संस्थेच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य आणि विज्ञान, महाविद्यालयात पंचक्रोशीतील ३६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी कला, वाणिज्य, विज्ञाण, किमान कौशल्य, हॉर्टीकल्चर, संगणकशास्र व बी.बी.ए. यांसारख्या पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. सध्या सटाणा बस स्थानका पासून विद्यार्थ्यांना पायी किंवा रिक्षाने प्रवास करावा लागत होता. परंतु आता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांच्या प्रयत्नांतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापासून महाविद्यालयापर्यंत सलग बस पास सुविधा मिळणार आहे. या संदर्भाचे पत्र सटाणा आगार चे व्यवस्थापक श्री. राजेंद्र शिवाजी आहिरे यांनी प्राचार्य डॉ. विजय मेधणे यांना दिले.

शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा अंगीकार करून सन १९६७ सालापासून सटाणा महाविद्यालयास गुणवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा आहे. महाविद्यालयाच्या या यशस्वी वाटचालीत संस्थाचालक, प्राध्यापक यांसोबतच आजी-माजी विद्यार्थ्यांचेही महत्वाचे योगदान राहीले आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. नितीन मैंद हे सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नाशिक व छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाव्यवस्थापक आहेत. त्यांच्या विशेष सहकार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट आता थांबणार आहे.

त्याबद्दल म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, चिटणीस श्री. दिलीप दळवी, महिला संचालिका श्रीमती शालनताई सोनवणे व बागलाण तालुका संचालक डॉ. प्रसाद सोनावणे यांनी श्री. नितीन मैंद, श्री. राजेंद्र आहिरे व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विशेष आभार मानले आहेत. त्यासोबतच सध्याच्या स्पर्धेच्या युगात पालकांनी आपल्या पाल्यांना उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या म.वी.प्र. संस्थेच्या सटाणा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी पाठवावे असे आवाहन देखील केले.

The post ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता सटाणा महाविद्यालायापर्यंत बस सेवा उपलब्ध first appeared on नाशिक बातमी.

https://nashikbatmi.com/?feed=rss2&p=1145 0