शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढा अन्यथा आत्मदहन; साई सावली फाउंडेशनचा प्रशासनाला इशारा 

सटाणा | प्रतिनिधी :/ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी च्या दोध्येश्वर नाका ते जिजामाता गार्डन दरम्यान अतिक्रमण न काढता नूतनीकरणाचे काम केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा साई सावली फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कोठावदे व इतर सहकाऱ्यांनी तहसीलदार बागलाण यांना दिला आहे.

महामार्गाच्या दोन्ही बाजूला शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, व्यापारी प्रतिष्ठाने व गुजरात राज्याला जोडणार जवळचा मार्ग असल्याने नेहमीच लोकांची व अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे अनेक अपघात होतात व अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. शहरवासीयांना अपेक्षा होती की रस्त्याचे नूतनीकरण होण्यापूर्वी अतिक्रमण काढले जाईल, परंतु तसे न होता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

अतिक्रमणधारकांना नोटीस दिल्या होत्या, पण त्यावर कोणतीही कारवाई न करता रुंदीकरणाचे काम सुरू झाले. यामुळे ठेकेदार व प्रशासनावर दबाव आहे का अशी शंका निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने २९ तारखेपर्यंत अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा साई सावली फाउंडेशनच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा प्रफुल्ल कुवर, चेतन सूर्यवंशी, विजय सोनवणे, भुषण निकम यांनी दिला आहे.

प्रतीक्रिया @@

अतिक्रमण काढणेसाठी शहरातील समाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा उपोषण केले आहे निवेदन दिले आहेत परंतु कुठलीही कारवाई होत नाही त्यामुळे आम्ही आता आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक दोन जीवांना इजा पोहोचल्यानंतर तरी शहर वासियांना मोकळा श्वास घेता येईल व इथून पुढे अरुंद रस्त्यामुळे जे अपघातात व त्यामुळे जर कोणाचा जीव जातं असेल तर तो नक्की वाचेल: प्रशांत कोठावदे अध्यक्ष: साई सावली फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *