सटाणा | प्रतिनिधी :/ बागलाण तालुक्यातील माळीवाडे या गावातून जनता विद्यालय मुल्हेर येथे पाचवी ते बारावी साठी दोनशे विद्यार्थी येतात. हे सर्व विद्यार्थी आदिवासी व गरीब कुटुंबातील असून यांना खाजगी बसने येणे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे हे विद्यार्थी रोज पाच किलोमीटर पायी प्रवास करून शाळेत येतात. पावसाळ्यात पावसामुळे तसेच सायंकाळी जाताना अंधार होतो आजूबाजूला दाट झाडी जंगल असल्याने खूप भीती वाटते, त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणून या विद्यार्थ्यांची पायपीट बंद व्हावी यासाठी विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक नंदन, डांग सेवा मंडळाचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब, पर्यवेक्षक श्री दिलीप जाधव, पर्यवेक्षक श्री मधुकर मोरे, विद्यालयाचे पास विभागाचे प्रमुख श्री निलेश जाधव, श्री चंद्रकांत येवला, श्री सचिन पगार, श्री राजेंद्र भोये, श्री महेंद्र सूर्यवंशी, श्री सचिन जाधव आदी शिक्षकांनी परिसरातील पालक, सरपंच व पदाधिकारी यांची भेट घेऊन एसटी महामंडळाची बस सुरू करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. तसेच सटाणा आगारात जाऊन आगार व्यवस्थापक स्थानक प्रमुख व वाहतूक नियंत्रक यांच्याशी वारंवार चर्चा केली. त्यांना विनंती अर्ज देऊन विद्यार्थ्यांची पायपीट थांबवण्यासाठी विनंती केली. अखेर आजपासून या माळीवाडे गावातील विद्यार्थ्यांसाठी सटाणा आगाराच्यावतीने स्वतंत्र बस सेवा सुरू करण्यात आली. यावेळी या बसचे वाजत गाजत माळीवाडे येथील ग्रामस्थांनी स्वागत केले. याप्रसंगी माळीवाड्याचे सरपंच श्री काशिनाथ गवळी उपसरपंच भाऊराव माळी तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच मोहोळागी च्या सरपंच सौ संगीता साबळे, जैतापूरचे सरपंच श्री तात्याभाऊ चौरे, सोमनाथ साबळे (सेवानिवृत्त पी.एस.आय.)आदी उपस्थित होते. या सर्वांनी आगार व्यवस्थापक श्री राजेंद्र अहिरे, स्थानक प्रमुख ते एस.आर. कांबळे, वाहतूक नियंत्रक पी. इ. सूर्यवंशी, चालक पी. एस. भामरे, वाहक श्रीमती आर. आर. जाधव, कर्मचारी जालिंदर बोरसे, विद्यालयाचे प्राचार्य पर्यवेक्षक सर्व शिक्षकांचे स्वागत केले व एसटीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस गावात आल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.