Deprecated: version_compare(): Passing null to parameter #2 ($version2) of type string is deprecated in /home/wagh/public_html/wp-content/plugins/elementor/core/experiments/manager.php on line 170
बागलाण अकॅडमीत वृक्षारोपण. - नाशिक बातमी

बागलाण अकॅडमीत वृक्षारोपण.

सटाणा :-येथील पोलीस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बागलाण अकॅडमीत 101 वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी gप्राणी आणि निसर्ग मित्र समाजसेवक राकेश घोडे हे म्हणाले की वृक्षवल्ली आम्हा सोयरे ह्या म्हणीनुसार झाडे लावा झाडे जगवा .झाडे आम्हाला ऑक्सिजन देतात शिवाय सावली सुद्धा देतात झाडांशिवाय आपण काही वेळ सुद्धा जास्त जगू शकत नाही वृक्ष आपल्याला रखरखत्या उन्हापासून सावली सुद्धा देतात. पशुपक्षी या झाडांचा सहारा घेऊन आपले जीवन सुरक्षित जगतात.माणसाचे झाडांशी फार महत्त्वाचे नाते जमले आहे. त्यांची सुरक्षा व पालन पोषण करणे हे मानव जातीचे महत्त्वाचे काम आहे मानवाने निसर्गावर जर प्रेम केले तरच पर्यावरण चांगले राहील .नाहीतर काही कालांतराने मानव सोबत पशुपक्ष्यांचे सुद्धा नुकसान होईल. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंदा महाले मा.प.सं सदस्य विरेश घोडे. सुनिल पाटील. देवेंद्र पवार. दिलिप खैरणार, अरुण देवरे ,गुलाबराव जैन, माजी सैनिक निलेश अहिरे, हंसराज अहिरे सुमित शेवाळे डीडीयु जीकेवायचे देवीसिंग राजपूत राहुल महाले देवरे सर भास्कर अहिरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *