आयकर विवरण पत्र भरतांना घ्यावयाची काळजी!

आयकर विवरण पत्र भरतांना घ्यावयाची काळजी!

प्राप्तिकर विवरणपत्र भरणे अनिवार्य – सी ए. डॉ.दिलीप सातभाई यांचे प्रतिपादन

जर आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी नवीन कर प्रणालीची निवड केली तर एकूण करपात्र उत्पन्न आर्थिक वर्षात रु. तीन लाखांपेक्षा जास्त असेल तर प्राप्तिकर विवरणपत्र भरणे अनिवार्य होणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी प्राप्तिकर विवरणपत्र नवीन करप्रणाली अंतर्गत दाखल करायचे नसेल तर जुन्या कर प्रणालीची निवड करणे आवश्यक आहे. नवीन कर प्रणाली एखाद्या व्यक्तीला सामान्य कर कपात आणि सवलतींचा दावा करण्याची परवानगी देत नाही. जसे की, घरभाडे भत्ता, आयुर्विमा किंवा आरोग्य विमा इत्यादी.

नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित वेबिनार मध्ये पुणे येथील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट सीए. डॉ दिलीप सातभाई यांनी मार्गदर्शन केले.

अधिकाधिक लोकांनी नवीन कर प्रणालीची निवड करावी अशी सरकारची इच्छा आहे. त्यामुळे ते अधिक आकर्षक करण्यासाठी त्यांनी या अंतर्गत काही फायदे दिले आहेत.

नवीन कर प्रणाली अंतर्गत किमान करपात्र मर्यादा पूर्वीच्या अडीच लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात आली म्हणजेच पन्नास हजार रुपयांची भरीव वाढ करण्यात आली आहे. जुन्या कर प्रणालीमध्ये मूळ सूट मर्यादा अडीच लाख रुपये आहे. याचा अर्थ अडीच लाख ते तीन लाख रुपयांच्या दरम्यान सकल करपात्र उत्पन्न असलेली व्यक्ती नवीन कर प्रणालीचाच पर्याय निवडणे फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

-नितीन डोंगरे (अध्यक्ष, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असो.)

जुन्या कर प्रणाली मध्ये प्राप्तीकर कायद्यातील कलम १६ अंतर्गत असणारी प्रमाणित वजावट, कलम ८० अंतर्गत रु. २.२५ लाख रुपयांची व कलम २४ अंतर्गत गृह कर्जावरील व्याजाची सवलत रु २ लाखापर्यंत अशी ४.७५ लाख रुपयांपर्यंत वजावट मिळू शकते तर नवीन कर प्रणाली अंतर्गत पगारदार वर्गास पन्नास हजार रुपयांची प्रमाणित वजावट मिळते असून इतर वजावट उपलब्ध नाही. यामुळे प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न व वजावट यानुसार कर प्रणालीची निवड करणे योग्य ठरेल.

योगेश कातकाडे (जनसंपर्कप्रमुख, नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असो.)

नवी कर प्रणालीशी जुळवून घेणे आता आवश्यक होणार आहे. येत्या वर्षात जर हीच कर प्रणाली सर्वाना सक्तीची करण्यात आली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. तथापि, केंद्र सरकारने ही कर प्रणाली लोकप्रिय होण्यासाठी एक पाउल मागे घेतले असून कोणत्याच वजावटी या करा प्रणालीत उपलब्ध होणार नाहीत असा सुरुवातीचा पवित्रा थोडा मावळ केला असून काही वजावटी अंतर्भूत करून पगादार वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, तथापि, सरकारची धोरणे पाहता या वजावटी काही काळासाठीच असतील हे मात्र निश्चित. !

या प्रसंगी वेबिनारचे वक्ते सीए डॉ दिलीप सातभाई यांचा ऍड.सुभाष घोडके (महा.टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन) यांचे हस्ते ट्रॉफी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रमुख वक्ते यांचा परिचय सीए हेमंत डागा यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री संजय निकम यांनी केले

तर ॲड. सतीश कजवाडकर यांनी आभार प्रदर्शन केले. वेबिनारच्या सर्व तांत्रिक कामकाज श्री. प्रकाश विसपुते यांनी बघितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *