“We Nashikkar | आम्ही नाशिककर” यांचे खड्डेमुक्त व सुरक्षित नाशिकसाठी भव्य मानवी साखळी आंदोलन
नाशिक | दि. २ ऑगस्ट २०२६
नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढते अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर आज “We Nashikkar | आम्ही नाशिककर” या नागरिकांच्या व्यासपीठाची बैठक उत्साहात पार पडली. शहरातील विविध भागांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, व्यावसायिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सर्वानुमते शुक्रवार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता नाशिक महानगरपालिकेच्या महासभेच्या दिवशी भव्य मानवी साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आंदोलनाचा मुख्य संदेश असेल –
“रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आम्ही आणखी एकही नाशिककर गमावणार नाही. सुरक्षित नाशिकसाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत.”
या आंदोलनाच्या माध्यमातून पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत:
– शहरातील जीवघेण्या खड्ड्यांवर तात्काळ उपाययोजना करून कायमस्वरूपी दर्जेदार दुरुस्ती करावी.
– खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांची आणि बाधित कुटुंबांची माहिती संकलित करून त्यांना न्याय व योग्य मदत मिळावी.
– रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करावी.
– शहरातील सर्व धोकादायक रस्त्यांची निश्चित कालमर्यादेत दुरुस्ती करण्याचा सार्वजनिक कृती आराखडा जाहीर करावा.
नाशिककरांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ज्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नाही त्यांनीही “We Nashikkar | आम्ही नाशिककर” WhatsApp Community द्वारे या जनआंदोलनात सहभागी व्हावे आणि आपल्या परिसरातील खड्ड्यांची माहिती, फोटो व सूचना पाठवाव्यात.
हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून, प्रत्येक नाशिककराच्या सुरक्षिततेसाठी, जबाबदार प्रशासनासाठी आणि खड्डेमुक्त, सुरक्षित नाशिकच्या निर्मितीसाठी आहे.
– We Nashikkar | आम्ही नाशिककर
मुख्य समन्वय समिती
सागर देशमुख 9730977097
अजिंक्य गीते 9850551007
प्रवीण जाधव 9028962703
विनोद थोरात 9370541118
कैलास देशमुख 8605019088
प्रफुल वाघ 9657576752
सोनू नागरे 7414967777
अमित कुलकर्णी 9657396576