आयकर अधिकारी धनराज बोराडे ‘उत्कृष्ट सेवा प्रामाणपत्राने’ सन्मानित
_दोन दशकांची उल्लेखनीय कामगिरीचा गौरव_
नाशिक येथील आयकर कार्यालयातील धनराज किसन बोराडे (आयकर अधिकारी) यांना ‘प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स सर्टिफिकेट ऑफ मेरिटोरियस सर्विस – २०२५’ अर्थात ‘उत्कृष्ट सेवा प्रमाणपत्राने’ १५ ऑगस्ट निमित्ताने पुणे येथे आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे (Principal Chief Commissioner of Income Tax, Pune) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्ताने पुणे येथील आयकर कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये विविध विभागातील अधिकारी यांचा प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले.
_दोन दशकांची उल्लेखनीय यशस्वी कामगिरीचा गौरव_
नाशिक येथील आयकर अधिकारी धनराज किसन बोराडे यांनी आयकर विभागामध्ये गेल्या २० वर्षापासून आयकर निरीक्षक व आयकर अधिकारी पदावर कार्यरत असून, अन्वेषण विभाग, मुख्यालय व मूल्यांकन अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या या प्रामाणिक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
_सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग_
दैनंदिन प्रशासकीय कार्यालयीन कामकाजासोबतच ते सामाजिक कार्यातही तितकेच सक्रिय आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य योजना (CGHS) नाशिक करिता स्थानिक सल्लागार समितीचे ते सदस्य म्हणून कामकाज करत आहे. त्यांच्या या कार्याची ही दखल घेत आयकर विभागाकडून यापूर्वी त्यांना ‘कोरोना योद्धा प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे, योगेश कातकाडे, भूषण डाग यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.