पंकज भामरे यांची उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर आसोशिएशनच्या कार्यकारी मंडळात निवड.

नाशिक प्रतिनिधी /: नाशिक येथील सुवर्णकार समाज बांधव, जन्मबंध फाउंडेशनचे सल्लागार व ट्रस्टी तसेच साईबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष व कर सल्लागार पंकज हेमराज भामरे यांची नुकतीच उत्तर महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्सटिशनर्स असोशिएशनच्या कार्यकारी मंडळात निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. जन्मबंध चे प्रमुख श्री प्रभाकर मोरे दादा व डॉक्टर श्रीकांत सोनवणे यांनी पंकज भामरे यांचे अभिनंदन केले. जन्मबंध ग्रूप साठी ही खूप कौतुकाची बाब असून पंकज भामरे यांचा समाज कार्यात सहभाग व मार्गदर्शन अजून वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे, माजी अध्यक्ष अनिल चव्हाण तसेच जनसंपर्क प्रमुख योगेश कातकडे यांनी ही श्री भामरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *