केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन यांच्या हस्ते नाशिक आयकर अधिकाऱ्याचा सन्मान
अर्थ खात्याच्या आयकर विभागाच्या १६५ वा आयकर दिवस विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दि. २१ ऑगस्ट साजरा करण्यात आला. या यावेळी आयकर विभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या अधिकारी यांचा सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयकर विभाग नाशिक ने केलेल्या विविध सर्च आणि सिझर (छापेमारी) कार्यवाही मध्ये सुमारे २०० कोटी पेक्षा जास्त रोकड जप्त केली तसेच रुपये १०,०००/- कोटी पेक्षा जास्त अघोषित उत्पन्न शोधून काढले होते. या उल्लेखनिय कार्याबद्दल केंद्रीय अर्थ खात्याच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) अंतर्गत सर्टिफिकेट ऑफ एक्सेलब्स” व सन्मान चिन्ह या पुरस्काराने, श्री मद्देवाड मारुती वामनराव, अतिरीक्त आयकर निदेशक, अन्वेषण विभाग, नाशिक, श्री सुशिल शेंडगे, आयकर उप-निदेशक (अन्वेषण) नाशिक श्री मुकुल कुलकर्णी, आयकर उप-निदेशक (अन्वेषण) औरंगाबाद आणि श्री. अजय जगताप, आयकर अधिकारी (अन्वेषण) नाशिक यांना केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारमन, अर्थ राज्य मंत्री श्री. पंकज चौधरी, महसुल सचिव, श्री. संजय मल्होत्रा, चेअरमन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) श्री रवी अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानित करण्यांत आले.
फोटो: (डावी कडून उजवीकडे) एच. बी. एस गीत, सदस्य – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, रवी अग्रवाल – चेअरमन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, संजय मल्होत्रा महसूल सचिव, सुशिल शेडगे आयकर उप-निदेशक-अन्वेषण नाशिक, मारूती मद्देवाड अतिरिक्त आयकर निदेशक – अन्वेषण नाशिक, श्रीमती निर्मला सितारमन केंद्रीय अर्थमंत्री, पंकज चौधरी अर्थ राज्यमंत्री, अजय जगताप आयकर अधिकारी अन्वेषण नाशिक, मुकुल कुलकर्णी आयकर उप-निदेशक (अन्वेषण) औरंगाबाद.