जागतिक योग दिनानिमित्त राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक प्रतिनिधी :/ राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने जागतिक योग साजरा करण्यात आला. संस्थेतर्फे दर वर्षी योग रत्न पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदाच्या वर्षीचे मानकरी सौ. सुचेता दिलीप गुजराथी यांना योग रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. योग हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. प्रत्येक भारतीयाने नियमित योगाभ्यास करून आपले आरोग्य सुधृढ ठेवले पाहिजे.योगाभ्यासातील साध्या सोप्या हालचालींनी आपण आपल्या व्याधी मुक्त करू शकतो. शारीरिक, मानसिक, आरोग्यासाठी प्रत्येक घराघरात योग पोहचविण्याचे काम जोमाने व्हायला पाहिजे. असे विचार सौ. गुजराथी यांनी आपल्या भाषणात मांडले.
नाशिक शहरात योगाचा प्रचार, प्रसार करणे, मोफत योग वर्गाचे आयोजन करणे, व्याख्यान देणे, योगशास्रा संबंधी ज्ञानार्जन करणे, सामान्य नागरिकांमध्ये योगाचे महत्व पटवून देणे, अशा कार्यात सहभाग, प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार संस्थेमार्फत दिला जातो. सौ. गुजराथी नाशिक शहरात अनेक वर्षापासून योगाच्या प्रचार, प्रसार, कार्यात सहभागी असून आजही कार्यारत आहे. त्याची दखल संस्थेने त्यांना पुरस्कार दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विनायक येवले यांनी यावेळी दिली
याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मुक्तेश्वर मुंनशेट्टीवार, सचिव सीए. प्रवीण कुलकर्णी, डॉ. महाले, मुकेश गांधी, बन्सी तलरेजा, गौरी पाथरकर, चैताली कंनसरा तसेच योग साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.